मोठी बातमी - राष्ट्रवादी च्या 'या' पदाधिकाऱ्यांमुळे आलेले संकट टळले
News24सह्याद्री -
दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय काल अहमदनगर शहरात आलाय. गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यासाठी प्रशासनासह खाजगी दवाखान्यांचे डॉक्टर सुद्धा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. काल दिवसभर ऑक्सिजनमुळे अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांना दुसऱ्या दवाखान्यात पाठवण्याची वेळ आली होती. दिवसभर रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटल शोधत फिरत होते. तर काही हॉस्पिटलमध्ये टाळे लावण्यात आले होते. असा भयंकर प्रकार चालू असताना रात्री एक ऑक्सिजनचा टँकर नगर शहरात दाखल झाला होता. मात्र दुष्काळात तेरावा महिना म्हणजे हा टँकर रात्री दोनच्या सुमारास नगर मधील लालटाकी परिसरात बंद पडला आणि पुन्हा एकदा सर्वांच्या काळजात धस्स झालं, कारण अनेक हॉस्पिटलमध्ये सकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सीजनचा साठा उपलब्ध असल्याने हा टँकर म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व होतं. मात्र राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी यांनी तातडीने लालटाकी परिसरात धाव घेत या ठिकाणी गाडी दुरुस्त करण्यासाठी फिटर उपलब्ध करून दिला आणि अखेर बंद पडलेला ऑक्सिजनचा टँकर सुरु झाला तो आपल्या स्थळी पोहचला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय.
No comments
Post a Comment