मोठी बातमी - नगरकर अजूनही रस्त्यावरच...
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केलं आहे, जिल्हा प्रशासनाने त्यानुसार नवीन अध्यादेश लागू केला असून या अध्यादेशानुसार एक मेपर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा च्या दरम्यान सुरू राहणार असे आदेश देखील देण्यात आलेत.
याच पार्शवभूमीवर आज सोमवार उजाडताच पाईपलाईन रोड ,एकविरा चौक ते कोहिनूर मंगल कार्यालय या परिसरामध्ये नागरिकांनी भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाल आहे, प्रशासनाने वारंवार बजावून सुद्धा नागरिकांनी सोशल डिस्टंसीगच्या नियमांच उल्लंघन केल्याचे याठिकाणी दिसून आलं आहे. मोठया प्रमाणात गाड्या देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. एकीकडे प्रशासन वारंवार जनतेला घरात राहण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे लोक या नियमाचे उल्लंघन करत आहेत. आज झालेल्या या गर्दीवरून लोकांना या कोरोना महामारीची भीती आहे कि नाही हाच प्रश्न आता उभा राहिला आहे.
No comments
Post a Comment