गॉसिप कल्ला - महासत्ता नाही, 'महाथट्टा' नक्कीच झालीय..!- अभिनेता हेमंत ढोमे
News24सह्याद्री - महासत्ता नाही, 'महाथट्टा' नक्कीच झालीय..!- अभिनेता हेमंत ढोमे... पहा गॉसिप कल्ला मध्ये
१. जिंकलस भाईजान..! लॉकडाउनमध्ये सलमान खान घेतोय कोरोना वॉरियर्सची काळजी
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरसच्या संकटातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतोय. सलमान हा कोरोना या लढाईत लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावला आहे.
2. ८९ वर्षांच्या आजीबाई अन ऑस्कर...Ann roth यांनी केली कमाल
९३ व्या ऑस्कर सोहळ्याला लॉस अँजेलिसमध्ये सुरुवात झाली असून या पुरस्कार सोहळ्यात आतापर्यंत बऱ्याच श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.यावेळी हा अवॉर्ड सोहळा स्पेशल आणि ऐतिहासिक झालाय . कारणही तसे खासच आहे ! या सोहळ्यात कोणी होस्ट नाही, प्रेक्षक नाहीत आणि नॉमिनीजदेखील नाहीत.
३. महासत्ता नाही, 'महाथट्टा' नक्कीच झालीय...! मुंबईतील 'हे' दृश्य पाहून संतापला अभिनेता हेमंत ढोमे
कोरोनाने स्थिती बिकट झाली झालीये .ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतोय, रूग्णालयात बेड मिळत नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता हेमंत ढोमे यांनी याबाबत एक संतप्त पोस्ट लिहिली आहे.लसीकरण केंद्रावरची गर्दी आणि यामुळे सामान्यांना सोसावा लागत असलेला त्रास यावर भाष्य करणारी जळजळीत पोस्ट त्याने शेअर केली आहे.
4. येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर
ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता आणि दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांच्यामध्ये ट्विटरवर शब्दप्रहार झालाय. कोरोना काळातील गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप शेखर गुप्ता यांनी केला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी "घाबरु नका, येणार तर मोदीच" असं उत्तर दिलं.
5. शेवटी घरची पोळी भाजीच बेश्ट...! 'त्याचा' फोटो शेअर करत प्रशांत दामले यांचं घरी राहण्याचं आवाहन
कोरोनामुळे बाहेरची स्थिती भीषण झालीये़ सध्या प्रत्येकजण कोरोना नावाच्या अदृश्य व्हायरशी लढतोय. कुणी घरात तर कुणी कोरोना योद्धा म्हणून ,अत्यावश्यक सेवेचा दूत बनून मैदानात. या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमी. मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी यानिमित्ताने कुटुंबाला जपणा-या गृहिणींचे आणि जीव धोक्यात घालून काम करणा-या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येकाचे आभार मानले आहेत.
No comments
Post a Comment