Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कोविड सेंटरची संख्या वाढवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

No comments

  News24सह्याद्री कोविड सेंटरची संख्या वाढवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. जगन्नाथ भोर यांच्याकडे सीईओंचा अतिरिक्त कार्यभार   (जिल्हा परिषद )      
 नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
यांची मसुरीला प्रशिक्षणासाठी निवड झालीय. त्यामुळे ते ५एप्रिल ते  १४ मे  पर्यंत ते मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण अकँडमीत  आय.ए.एस. पायाभूत प्रशिक्षणासाठी जाणार आहेत.  

२. कोविड सेंटरची संख्या वाढवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन (बाजारसमिती )
नगर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू झाला असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे . यासंदर्भात तालुका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत तालुक्यात कोविड सेंटरची संख्या वाढवावी अशी मागणी नगर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना केली आहे. 

३. लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार  (तोफखाना.पो.स्टे )
लग्नाचे आमिष दाखवून नगर शहरातील एका पस्तीस वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन आरोपींच्या विरोधात अत्याचारास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घरकाम करणाऱ्या या महिलेची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुकेश पाठक याच्याशी ओळख झाली. 

४. उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र उपयुक्त नियुक्त करण्याची मागणी   (मनपा आणि वाकले )
नगर शहरात विविध कामांसाठी निधीची गरज आहे. त्यासाठी नगरसेवकांकडून निधीच्या तरतुदीत वाढ करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात नगरसेवक निधीच्या तरतुदीसहा इतर निधींमध्येही  वाढ करण्यात येणार असल्याचं सांगत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.

५. लॉकडाउनची व्यापाऱ्यांमध्ये धास्ती (कापड बाजार )
नगर शहरात लोकडाऊन करण्याची चर्चा सर्वत्र होत असताना याची व्यपाऱ्यानी चांगलीच धास्ती घेतलीय. लॉक डाऊन करा ,निर्बंध पाळा मात्र, तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही. या सरकारच्या भूमिकेने व्यापारी अडचणीत आले आहेत. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *