मोठी बातमी - डॉक्टरांचा जिल्हा प्रशासनाला सजग इशारा
News24सह्याद्री -
मागील काही दिवसापासून जिल्हा प्रशासन आणि डॉक्टर यांच्यात सध्या ऑक्सिजन च्या पुरवठ्यावरून अनोखा संग्राम रंगल्याचे चित्र नगर शहरात पाहायला मिळालं आहे. नगर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी आता त्यांच्या स्तरावर ऑक्सिजन जनरेशन प्लँटची उभारणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिल्यांनंतर इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनाच निर्वाणीचे पात्र पाठवलं आहे. यावरून इंडियन मेडिकल असोसिएशन हि संस्था आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश तर दिले मात्र रुग्णालयामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि हा निर्मिती प्रकल्प उभारायला सांगणे हे जबादारी टाळण्यासारखे असून हास्यास्पद आहेत असं डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणत्याही कायद्याअंतर्गत ऑक्सिजनचा प्लँट उभारणे हि हॉस्पिटलची जबाबदारी नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खाजगी रुग्णालये बाजारभावाने हा ऑक्सिजन विकत घेण्यासाठी तयार आहेत मात्र हा ऑक्सिजन उपलब्ध करून देणे हि प्रशासनाची जबाबदारी आहे असं इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठ्वलेल्या पत्रात सांगितलं आहे. यावेळी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मुत्यू झाला तर जिल्हा प्रशासन याला पूर्णतः जबाबदार राहील आणि ऑक्सिजनच्या उप्लब्धतेमध्ये अश्याच प्रकारे अडथळे येत राहिले तर खाजगी रग्णालये उपचार करणे बंद करतील असा इशाराच या संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
No comments
Post a Comment