Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - वाढत्या लोकसंख्येवर कंगना राणौतचे ट्विट

No comments

  News24सह्याद्री वाढत्या लोकसंख्येवर कंगना राणौतचे ट्विट..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

1. अजय देवगण वेबसीरिजमध्ये

नवाजुद्दीन सिद्धीकी, अभिषेक बच्चन, सैफ अली खान यांच्यानंतर आता बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण डिजिटल प्लॅटफॉर्मवर एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी अजयने आपल्या आगामी वेबसीरिजची घोषणा केली आहे.


2. वाढत्या लोकसंख्येवर कंगना राणौतचे ट्विट
कंगना राणौतने  पुन्हा एकदा एक वादग्रस्त ट्विट केले आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी कठोर कायदा बनवावा, असे मत व्यक्त करतानाच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत तिने विधान केले. तिसरे मुलं जन्मास घालणा-यांना तुरुंगात डांबा अथवा त्यांच्यावर दंड ठोका, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.


3. सुंदर असण्याचा आणि वजनाचा काय संबंध?

ग्लॅमर इंडस्ट्रीत हिरोईनचे वजन हा मोठा संवेदनशील विषय. करिनाने झिरो फिगरचा ट्रेंड आणला आणि यानंतर तर नट्या वजनाबद्दल कमालीच्या काटेकोर झाल्यात. ग्लॅमर इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचे सोडा पुढे सर्वसामान्य मुलीही वजनाबद्दल नको इतक्या काळजी घेऊ लागल्या. इतक्या की, सुंदर फिगर हेच सुंदरतेचे माप बनले. समाजाची दृष्टी अचानक इतकी काही बदलली की, लठ्ठ मुलींना, काहीशा गुटगुटीत हिरोईन्सला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले. अगदी सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, हुमा कुरेशी या बॉलिवूडच्या अभिनेत्री बॉडी शेमिंंगच्या बळी पडल्या. 

4. उपकार करा आणि फोटो स्वत:जवळ ठेवा!

मालदीवमध्ये जाऊन तोकड्या कपड्यांतील स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींना श्रुती हासनने चांगलेच सुनावले. आता देशातील सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनीही या सेलिब्रिटींना फैलावर घेतले आहे.शोभा डे  यांनी रोहिणी अय्यर यांनी लिहिलेली एक नोट आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केली आहे.

5. प्रिया बापटच्या फोटोवर यूजर्सने केलेली कमेंट आली चांगलीच चर्चेत

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. प्रियाने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती फ्रेश मूडमध्ये कॅमेऱ्याकडे बघून हसताना दिसतेय. सोशल मीडियावर तिचा हा फोटो व्हायरल झाला आहे. प्रियाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना ही आवडला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *