Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरळीत

No comments

  News24सह्याद्री -




ऑक्सीजनच्या मुद्यावर रणकंदन पेटले! अनेकांचा जीव टांगणीला लागला. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक देवाचा धावा करू लागले आणि संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आता पुढे काय होणार या चिंतेत पडले. या विषयाच्या अनुषंगाने न्यूज २४ सह्याद्रीने अत्यंत खमकी भूमिका घेतली. नगरमधील ऑक्सीजनची गंभीर समस्या उचलून धरताना या विषयाकडे थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापासून जिल्हाधिकारी आणि पोपटराव पवार यांचे लक्ष वेधले. त्यानंतर रात्री उशिरा नगरमध्ये दोन टँकर दाखल झाले आणि आज सकाळी त्यामाध्यमातून बहुतांश हॉस्पिटलला ऑक्सीजनचा पुरवठा झाला. मात्र,

 नगरला जे टँकर आले ते सहजासहजी आले नाही! हे टँकर पुणे जिल्ह्यातील शिरुर हद्दीत येताच त्यांना अडविण्यात आले आणि ते पुण्याकडे घेऊन जाण्याचा आग्रह सुरू झाला. सारे काही अनाकलनीय आणि धक्क़ादायकच म्हटले पाहिजे. हे टँकर जर पुण्याकडे गेले असते तर नगरमध्ये हाहाकार माजला असता आणि अनेकांचे जीव गेले असते. त्यातून अराजक निर्माण झाले असते. जी परिस्थिती निर्माण झाली असती त्याचे वर्णनही करता आले नसते. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी कणखर भूमिका घेत थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच निर्वाणीची भाषा सुनावली आणि त्यानंतर हे टँकर सुखरुपपणे नगरमध्ये दाखल झाले. बाळासाहेब थोरात यांचे नगरकरांच्या वतीने खुप खुप अभिनंदन आणि आभार! 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *