Breaking News

1/breakingnews/recent

गरजेनुसार रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा वापर करावा नाही तर कारवाई करण्यात येईल

No comments



मुंबई -

अजित पवार म्हणाले की गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रूग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.त्यामुळे गरज नसताना रेमडेसिविर,ऑक्सिजनसाठी रूग्ण व नातेवाईकांची कोंडी करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर आता तपासणी पथकाची करडी नजर राहणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार याांनी सांगितले आहे. पवार पुढे म्हणाले, या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू. सद्यस्थितीत बारामती शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे.

 कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले आहे. नागरिकांकडून त्या निबंर्धांचे पालन केले जाईल, यासाठी दक्ष राहून काम करा. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचा वेग वाढवावा. वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसेच निधीचीही कमरतरता पडू दिली जाणार नाही. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, ऑक्सिजन वापराबाबतही सर्व रूग्णालयांनी काळजीपूर्वक वापर करावा, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती येथील पदाधिकारी, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *