पुण्यात मृत रुग्णांना नेण्यासाठी शववाहिका कमी पडल्या, स्कुल बसमधून होणार मृतदेहांची वाहतूक
पुणे -
महाराष्ट्रात राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. कोरोनाची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. संसर्ग अत्यंत वेगाने होत आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. पुण्यात मृत रुग्णांना नेण्यासाठी शववाहिका कमी पडत आहे.
मृत रुग्णांना नेण्यासाठी स्कूल बसचा वापर करण्यात येनार आहे. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.
No comments
Post a Comment