Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - रेमडेसिवीर औषधाच्या टंचाईवरील वाद आता पोहोचला पोलीस ठाण्यात

No comments

        News24सह्याद्री -



राज्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकीय वाद पेटला आहे. आता तर हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकांला  मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही माहिती मिळताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोहोचले राज्यात रेमडेसिवीर या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आहे. 

असे असताना ग्रुप फार्मा कंपनीकडे सुमारे २० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याचे समजते. हा साठा महाराष्ट्रात विकण्यासाठी राज्य सरकारने या कंपनीला तातडीने परवानगी दिली आहे तरीही इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत असे चित्र आहे. अशात गुजरात सरकारने इतर राज्यात रेमडेसिवीर निर्यात करण्यावर बंदी घातली. त्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा राजकीय वाद भडकला होता. ग्रुप फार्म कंपनीच्या राजेश जैन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बीकेसी येथे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात त्यांना नेण्यात आले आहे. दमणच्या ग्रुप फार्मा या कंपनीच्या मालकाने इंजेक्शन देण्यात पुढाकार घेतला होता त्यांना पोलिसांनी अचानक ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *