शहराची खबरबात - नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सव्वा दोन लाखांचा दंड
News24सह्याद्री - नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सव्वा दोन लाखांचा दंड... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. मनसेकडून पालक मंत्री हसन मुश्रीफ यांचा निषेध
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेन दिवस गंभीर होत असतांना हि जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यात येत नसल्याने मनसेने त्यांचा वेगळ्या प्रकारे निषेध केला आहे. मुश्रीफ यांना अहमदनगर जिल्ह्यात घेऊन येणाऱ्यास ५००० रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे.
२. टीम ५७
फॅमिली पान पकवानच्या संकल्पनेतून रुग्णांच्या नातेवाईकांना मदत
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर जिल्ह्यात बीड ,पैठण येथील अतिसंवेदनशील रुग्ण नगर शहरामध्ये उपचार घेण्यासाठी येत आहेत. संचारबंदी सुरु असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था होत नसल्याने अनेकांना उपाशीच राहावं लागत आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून आणि सामाजिक भावनेतून टीम ५७ फॅमिली पान पकवान यांच्या संकल्पनेतून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पार्सल स्वरूपात दोन वेळच्या जेवणाची मोफत सेवा सुरू करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
३. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सव्वा दोन लाखांचा दंड
संचार बंदीमध्ये घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर जिल्ह्यात 640 केसेस दाखल करण्यात आल्या असून त्यांच्याकडून दोन लाख 33 हजार 215 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 14 एप्रिल पासून जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
४. संवेदनशील होऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करा - कळमकर
नगर शहरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.रुग्णसंख्या आणि बेडची उपलब्धता यात तफावत आहे. रुग्णांसाठी बेड मिळवताना त्यांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. जिल्हा प्रशासन बेडची संख्या वाढवत असल्याचे सांगत आहे मात्र तरीदेखील ऑक्सिजन बेडची कमतरता आहे.
५. मोबाईलची आता धूमस्टाईल पद्धतीने चोरी
आतापर्यंत विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरून भरधाव येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्यात येत होत,आता अशाच धूमस्टाईल पद्धतीने रस्त्यावरून जाणाऱ्याचे मोबाईल चोरण्यात येत आहेत. सावेडी एमआयडीसीत झालेल्या दोन घटनांवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकवीरा चौक परिसरात असलेल्या तुळजाभवानी नगर मध्ये आरती बडगु या आपल्या घरासमोर मोबाईलवर बोलत उभ्या होत्या.
No comments
Post a Comment