Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - कोपरगावात आठ दिवस कडकडीत संचारबंदी

No comments

     News24सह्याद्री - कोपरगावात आठ दिवस कडकडीत  संचारबंदी....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES

1. कोव्हीड  रुग्णांना योगा व प्राणायाम यांचे धडे  
 कोरोना आजारापासून मुक्त होण्यासाठी औषधांबरोबरच इतरही उपाय अमलात आणले तर आजार लवकर बरा होईल या उद्देशाने जनशक्ती कोव्हीड सेंटर अमरापुर येथे  रुग्णांना योगा व प्राणायाम यांचे धडे देण्यात आले. पूर्वीपासून योगा व प्राणायाम यांचे महत्त्व अमूल्य आहे. आजार दूर करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल या हेतूने रुग्णांना योगा शिकवण्यात येत आहे. 

2. फरार अक्षय कुलथे उत्तरप्रदेशात जेरबंद
राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास दातीर यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला चौथा आरोपी अक्षय कुलथे याला उत्तरप्रदेशात जेरबंद करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने चटिया  येथून कुलथेला ताब्यात घेतले.

3. आ. आशुतोष काळे यांनी दिले एक हजार टेस्टिंग किट
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला टेस्टिंग किटचा तुटवडा जाणवत होता. कोरोना संकट आल्यापासून आमदार आशुतोष काळे आरोग्य विभाग व प्रशासनाला वेळेत सर्वोतोपरी मदत करीत आहे. 

4. कोणत्याही कारवाईला घाबरत नाही- खा. विखे  
आपण जी रेमडेसिवीर इंजेक्शन आणली, त्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. इंजेक्शनमुळे ज्यांचे जीव वाचले, ते लोक माझ्या पाठिशी आहेत. आता ती इंजेक्शन संपली आहेत, त्यामुळे कारवाई आणि जप्त काय करणार? माझा तो व्हिडिओ नीट पाहिला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सांगून नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राजकीय आणि कायदेशीर वादाला उत्तर दिले.

5. वाहन चालकांना  लुटणारी टोळी जेरबंद  
वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना अडून त्यांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे या प्रकरणी ४ आरोपींना अटक करून त्यान्च्याकडून सुमारे एक लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

6. माजी मंत्री पिचड यांचे  मुख्यमंत्र्यांना साकडे
अकोले तालुक्यातील कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या अत्यंत भयावह असून रुग्णांना उपचार मिळत नाही, ऑक्सीजन चा तुडवडा, इंजेक्शन साठी रुग्णांच्या नातेवाईक वणवण फिरत आहे.रुग्णांकडे उपचारासाठी पैसे नाही, जमिनी, घरदार विकुन सावकाराकडून कर्ज घेऊन उपचारासाठी पैसे असुनही बेड मिळत नाही.

7. पारनेर तालुका पाच दिवस बंद
 पारनेर येथे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्याने महसूल व पोलिस प्रशासन यांनी खुल्या ठिकाणी भरत असलेल्या बाजारावर कारवाई केली तसेच पाच दिवसांसाठी पूर्ण पारनेर तालुका अत्यावश्यक सेवा मेडिकल हॉस्पिटल वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे

8. बाभळेश्वरला पकडलेली 'ती' दारू तब्बल 75 लाखांची
श्रीरामपूर येथील दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्र. २ यांनी चार दिवस बाभळेश्वर परीसरात साफळा रचून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली गोवा राज्यातील ७४ लाख ८८८ हजार रुपयांचे दारुचे १ हजार २०० बाॅक्ससह आयशर ट्रक असा एकूण ९४ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त केला. 

9. ऑक्सिजनचा टँकर पोलीस बंदोबस्तात संगमनेरच्या दिशेने रवाना
संगमनेर शहरांमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे त्यामुळे  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम यांनी तातडीने गुजरात मधून 24 टन ऑक्सिजन टँकर पोलिस बंदोबस्तामध्ये आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत सध्या हा टँकर इगतपुरी पास करून संगमनेर च्या दिशेने येत आहे नायब तहसीलदार उमाकांत कडणोर आणि रवी  थोरात हे पोलिस बंदोबस्तामध्ये हा टँकर घेऊन संघटनेच्या दिशेने चालले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *