मोठी बातमी - नागरिकांनो आता घराबाहेर पडणं टाळाच !
News24सह्याद्री -
अत्यंत चिडणारी बातमी आहे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्ह्यात आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. मात्र ही आढावा बैठक चालू असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील गेट बंद करण्यात आले होते. मुश्रीफ जेथे बैठक घेत होते, त्या खालील मजल्यावर कोरोना रुग्णांसाठी रेमडेसीविर बाबत कंट्रोलरूम स्थापन करण्यात आली आहे. मात्र गेट बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी विनंती करूनही त्यांना कंट्रोल रूम मध्ये जाऊ देण्यात येत नव्हते. गेटवर मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने फक्त काही राजकीय लोकांनाच आत जाता येतं नव्हतं, त्यामुळे तेथे आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय.
हसन मुश्रीफ यांची बैठक फक्त नावालाच होती की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास न होता औषधे अथवा माहिती मिळावी अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार करीत आहेत. मात्र पालकमंत्र्यांनी या घोषणेला हडताल फासल्याच चित्र दिसून आला आहे. इकडे सर्वसामान्य माणूस औषधासाठी वणवण फिरत आहे. मात्र मंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेलाच कंट्रोल रूम पर्यंत जाऊ न देणाऱ्या पोलिसांना आणि मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना या गोष्टींचे भान नसावे का? त्यामुळे पुढील काळात मंत्र्यानी आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.
No comments
Post a Comment