मोठी बातमी - नगरचे कंट्रोल रूमच आउटऑफ कंट्रोल
News24सह्याद्री -
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात २४ बाय ७ कंट्रोल रूम ची स्थापना केली मात्र या कंट्रोल रूम चा काहीच उपयोग नसल्याचे चित्र या कंट्रोल रूम मध्ये पाहायला मिळतंय या ठिकणी कोरोना रुग्णांचे नातेवाईक आशेने फोन करतात अथवा समक्ष विचारपूस करण्यासाठी येतात मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडते पाहुयात कंट्रोल रूम च्या सध्यस्थितीचे चित्र नक्कीच हे दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही नागरिक रेमडेसीवर आणि ऑक्सिजन च्या मागणी साठी या ठिकाणी येतात मात्र त्यांच्या पदरी निराशेशिवाय काहीच पदरी पडत नाही.
सर्वकाही हतबल झाल्याचं चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून येतंय जिल्ह्यात ४५०० हजार असे रुग्ण आहेत त्यांना रेमडेसीवर ची गरज आहे मात्र एवढा साठा जिल्ह्यात उपल्बध नसल्याची कबुली अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त पी एन कातकडे यांनी दिलीय कातकडे यांनी दिलेली माहिती नक्कीच धक्कदायक असून अन्न व औषध प्रशासनही हतबल झुल्याचं आपल्याला दिसून येतेय मात्र प्रशासनाने सुरु केलेल्या कंट्रोल रूम म्हणजे नागरिकांच्या प्रश्नावर फसवणूक तर नाही ना असा प्रश्न समोर येतोय
No comments
Post a Comment