Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बिल दाखवले तरच रुग्णांना रेमडेसिविर

No comments

  News24सह्याद्री बिल दाखवले तरच रुग्णांना रेमडेसिविर..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. दुपारी सामसूम, पण सकाळी तोबा गर्दी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला, तरी लोकं घरात बसायला तयार नाहीत. भाजीपाला खरेदी करण्यासाठी सकाळी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बाजारात तोबा गर्दी होत आहे. दिवसभर विनाकारण बाहेर फिरणारे आढळून येत आहेत. 

2. रुग्णांना अजून मिळेना ऑक्सीजन बेड
जिल्ह्यात अजूनही ऑक्सीजन चा तुटवडा कायम आहे ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असला तरी रुग्णांना मात्र ऑक्सीजन बेड मिळत नसल्याची स्थिती आहे ऑक्सीजन बेड मिळाला तर ऑक्सिजनची टंचाई असल्याने खासगी रुग्णालयातील डॉक्टर आता प्रिस्क्रिप्शन वरच ऑक्सीजन सिलेंडर लिहून देत आहेत 

3. बिल दाखवले तरच रुग्णांना रेमडेसिविर
रेमडेसिविर  आणि टॉसिलीझूमॉब  सारखी महागडी इंजेक्शन कुठून आणली त्याचे बिल दाखवल्याशिवाय उपचार घेत असलेल्या रुग्णाला इंजेक्शनचा डोस दिला जाणार नाही असा निर्णय नगर येथील इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने घेतला आहे 

4. ऑनलाइन रेमडेसिविर विक्री करून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल  
ऑनलाइन राम्डेसिवीर इंजेक्शन विक्रीचा बहाणा करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला सध्या सोशल मीडियावर फेक मेसेजेस व्हायरल होत असून त्यात नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

5. नगरमध्ये कोरोना  लसीचा तुटवडा
शहरात महापालिकेने आठ आरोग्य केंद्र 12 खाजगी रुग्णालयात कोरोना  प्रतिबंधात्मक लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे लस  घेण्यासाठी आरोग्य केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत मात्र महापालिकेत  रोज केवळ दोन हजार चारशे लसींचा पुरवठा करण्यात येत आहे ४५ वर्षांवरील नागरिकांचेच अजून लसीकरण पूर्ण झाले नाही.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *