मोठी बातमी - ऑक्सिजनसाठी खाजगी दवाखाने आणि प्रशासन यांच्यात संघर्ष
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मिळणे तर जवळपास अशक्य झाले असून, शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडही मिळेनासे झाले आहेत.जिल्ह्यात रुग्णांना मागील आठवड्यापासूनच ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता तर शासकीयच नव्हे, खासगी रुग्णालयांमध्ये देखील ऑक्सिजन बेड मिळणे जवळपास अशक्य झाले आहे. हे पाहता जिल्हा प्रशासनानी नियंत्रण संपर्क क्रमांक जाहीर केला परंतु या क्रमांका वर फोन केला असता एक वेबसाइट दिली जाती.ती सर्च केली असता त्या हॉस्पिटल ने ती अपडेट केली नसल्यामुळे तेथील रिक्त बेड ची माहिती मिळत नाही.दिवसभरात अनेक हॉस्पिटल ला फोन लावूनही एकाही ठिकाणी बेड रिक्त असल्याचा दिलासा कुणाकडूनही मिळत नाही. जोपर्यंत एखादा रुग्ण बरा होऊन घरी जात नाही किंवा कुणाचे निधन होत नाही तोपर्यंत त्या रुग्णालयातील बेड अन्य कुणाला मिळू शकत नाही, अशी परिस्थिती कायम आहे. रुग्णांना प्रचंड ओळखपाळख काढून किंवा रुग्णालयांच्या सर्व अटी मान्य करीत रुग्णाला दाखल करून घेण्यावाचून संबंधितांच्या कुटुंबीयांसमोर कोणताही मार्ग उरलेला नसल्याने रुग्ण आणि कुटुंबीय सर्व रुग्णालयांकडे अक्षरश: गयावया करीत ऑक्सिजन बेडची मागणी करीत असल्याची सध्याची शहर व जिल्हातील परिस्थिति आहे. एकंदरच जिल्ह्याची परिस्थिति हाता बाहेर गेली आहे.
No comments
Post a Comment