शहराची खबरबात - शहरातील सर्व भाजीपाला बाजार मनपाकडून बंद
News24सह्याद्री - शहरातील सर्व भाजीपाला बाजार मनपाकडून बंद... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. शहरातील सर्व भाजीपाला बाजार मनपाकडून बंद
कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात कलम 144 लागू केली आहे. याबाबत निर्बंध घालताना अत्यावश्यक बाबीत भाजीपाला दुकाने आणि फळविक्रेते यांचा समावेश केलेला आहे.
2. सिव्हीलचे 50 कर्मचारी पॉझिटिव्ह
जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात सिविल हॉस्पिटल मधील तब्बल पन्नास कर्मचाऱ्यांना कोरोची लागण झाली असून त्यात सात डॉक्टर्स आणि २० नर्सेस यांचा समावेश आहे. या रुग्णालयात दररोज तीन हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या होत असून सध्या सर्व कोरोना बेड फुल झाले आहेत.
3. साडेनऊ हजार रिक्षाचालकांना मिळणार दीड हजाराची मदत
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारने एक मेपर्यंत आणखीन कडक निर्बंध जारी केले असून या काळात आर्थिक दुर्बल घटकांसाठी मदत जाहीर केली आहे.
4. लिफ्ट मागून लुटणारी महिला जेरबंद
रस्त्यावर उभ राहून ती मंजुळ स्वरात वाहनचालकांना लिफ्ट मागायची. निर्जनस्थळी वाहन थांबायला सांगायची आणि थेट चालकाकडे पैशाची मागणी करायची पैसे देण्यास नकार दिला तर आरडाओरडा करून गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची वाहन चालक हि जवळ आहे.
5. साडेतीन हजार नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम हाती घेतली असून आतापर्यंत तीन हजार पाचशे नागरिकांची ट्रेसिंग करण्यात आली आहे. शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारी 382 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
No comments
Post a Comment