ग्राउंड रिपोर्ट - त्या ७ जणांच्या मृत्यू प्रकरणी अद्यापही संशय
News24सह्याद्री -
नगर शहरातील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती हाती येत असून या बाबत आता पोलीस तपास करत आहेत. शहरातील नगर पुणे रोडव हे हॉस्पिटल आहे. सध्या नगर जिल्ह्यात ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. रोज सरासरी 60 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. सोमवारी 20 तर मंगळवारी 50 मेट्रिक टन ऑक्सीजनचा साठा नगरशहराला मिळाला होता, मात्र रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने नगर शहरातील सर्वच हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले आहेत, शहराला मिळणारा ऑक्सिजनचा साठा हा समप्रमाणात वाटला जात नसल्याने अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचा आरोप डॉक्टरांनी मध्यंतरी केला होता, त्या नंतर हि, ऑक्सिजन बाबत प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.
या हॉस्पटिल परिसरातून माझी सहकारी किरण हिने परिस्थितीचा आढावा घेतलाय. किरण काय सांगशील, काय परिस्थिती आहे हॉस्पिटल परिसरात. हॉस्पिटल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून हॉस्पिटल मध्ये सध्या कोणालाही प्रवेश दिला जात नाही मात्र हि घटना ऑक्सिजन अभावी घडलेली नाही. अशी माहिती हॉस्पिटल व्यवस्थापन विभागाने दिली आहे.पाहुयात हॉस्पिटल प्रशासनाचे या बाबत काय म्हणणे आहे. हॉस्पिटल प्रशासन दावा करतेय कि हे मृत्यू ऑक्सिजन अभावी गेलेले नाहीत. मात्र अचानक सात मृत्यू होणे, हि गंभीर बाब असून आता या प्रकारांचा तपास केल्या नंतरच सत्य काय आहे ते बाहेर येईल.
No comments
Post a Comment