Breaking News

1/breakingnews/recent

शेवटच्या क्षणी, आमिर खानने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला, समोर आले मोठे कारण

No comments



मुंबई -

बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकचा ट्रेंड सुरु आहे. यातील एक सिनेमा आहे विक्रम वेधा. चाहते बर्‍याच दिवसांपासून या प्रोजेक्टची प्रतीक्षा करत आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या सिनेमाचे मेकिंग राईट्स विकत घेतले आहे. आणि प्री-प्रॉडक्शनची तयारीही सुरू केली होती. या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती आमिर खान होता आणि या चित्रपटासाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता. तसेच सिनेमातील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी सैफ अली खानला साईन करण्यात आले होते. पण शेवटच्या क्षणी, आमिर खानने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. ज्यानंतर या चित्रपटासाठी निर्मात्यांना हृतिक रोशनला घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तमिळ फिल्म 'विक्रम वेधा' चित्रपटाला गायत्री पुष्कर दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आर.माधवन दिसला होता.त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. तर खलनायकाची भूमिका विजय सेतुपाठी यांनी केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, आमिरला हा प्रोजेक्ट खूप आवडला होता. पण त्याला पटकथामध्ये बदल हवा होता. जेणेकरून त्याचा सिनेमा चीनमध्येही बंपर कमाई करु शकेल. पण त्यानंतर भारत आणि चीनमध्ये भांडण झाले आणि त्यांनी विक्रम वेध न करण्याचा निर्णय घेतला. विक्रम वेधा'च्या रिमेकचे निर्माते आता हृतिक रोशनबरोबर लवकरच या चित्रपटाचे काम सुरू करणार आहे. चित्रपटात सैफ अली खान आणि हृतिक समोरासमोर दिसणार आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *