मोठी बातमी - कान्हूर पठार येथे आरोग्य केंद्रात गोंधळ; सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा
News24सह्याद्री -
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे आरोग्य केंद्रात सकाळपासूनच मोठा गोंधळ निर्माण झाला असून जे नागरिक ऑनलाइन नाव नोंदवून लस घेण्यासाठी आलेले आहे. त्यांची नोंदणी रद्द करून पुन्हा नव्याने नाव नोंदणी करा असे उत्तर आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिल्याने एकच गोंधळ उडाला होता एकाच वेळी अनेक नागरीक याठिकाणी जमल्याने सोशल डिस्टन्स पुरता फज्जा उडाल्याचे चित्र या ठिकाणच्या आवारामध्ये दिसून आलं याबाबत आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत होती मात्र आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदार पणामुळे विनाकारण आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला एवढी मोठी गर्दी आरोग्य केंद्रांमध्ये होत असेल तर निश्चित कोरोना अजून फैलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा आरोग्य केंद्र कोरोनाचे स्प्रेडर बनू शकते.
No comments
Post a Comment