Breaking News

1/breakingnews/recent

१ एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ला फटका.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


१. भारतात आणखी तीन राफेल दाखल
भारतीय हवाई दलाच्या ताकदीत आता चार पटीनं वाढ झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा देशात आणखी तीन राफेल लढाऊ जेट दाखल झाले आहेत. 

२. शरद पवारांचा ममता बॅनर्जींना पाठिंबा
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान होत असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 

३. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ला फटका
सततच्या बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसत आहे. यापूर्वी अनेक खेळाडूंनी बायो-बबलबाबत तक्रार केली.

४. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका
सबका साथ, सबका विकास, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण आहे. मात्र काँग्रेस लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लिम, आदिवासी-बिगर आदिवासी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

५. कास धरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होणार
वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांची  जीवनदायी असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून या प्रकल्पाला मंजूरी दिली होती. 

६. मा.आमदाराच्या पॅरोलवर सुटलेल्या मुलाचा गळफास
पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या माजी आमदार पुत्राने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सुनील पाचपुते याने आत्महत्या केली. लॉकडाऊनमुळे तो किनवट तालुक्यातील जलधारा इथे आपल्या गावी आला होता.

७. आ.रोहित पवार यांच्या वडिलांना 'कृषीरत्न' पुरस्कार जाहीर
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वडिलांना 2019 चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंदर्भात स्वत: रोहित पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. तसेच, आपल्या वडिलांचे अभिनंदनही आमदार लेकानं केलंय. 

8. प्रसिद्ध संगीतकार 'बप्पी लहरी' कोरोना पॉझीटीव्ह
सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसत आहे,  त्याचा प्रभाव बॉलिवूडवर झालेला दिसून येतोय. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 

९. पेट्रोल डिझेलचे वाढते दर कायम
मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या. या महिन्यात पेट्रोल 61 पैसे स्वस्त झालय तर  डिझेलचे दर 60 पैशांनी कमी झालेत. 

10. छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी होणार
लघु बचत योजनेवरील  व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 







No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *