Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कर्फ्यूबद्दल नगरकरांना भीती नाही का?

No comments

     News24सह्याद्री -




TOP HEADLINES


1. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार
नगर शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा काही लोक घेत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. १२ ते १८ हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली. आता तब्बल ३७ हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरात दोघांना अटक केली आहे.

२. नगरसाठी लवकरच ऑक्सिजन,रेमडेसिविर उपलब्ध होणार
नगर शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांसाठी रेडमेसिविर आणि ऑक्सिजनचा लवकरच पुरवठा केला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

३. रेमडेसिव्हीरअभावी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू  
महापालिकेचे दोन कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णांना इंजेक्शनची गरज असल्यामुळे कामगार संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली होती, मात्र इंजेक्शन उपलब्ध झाल नाही. त्यामुळे त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.यामुळे महापालिका कामगार संघटना आक्रमक झाली आहे.

४. कर्फ्यूबद्दल नगरकरांना भीती नाही का ?
नगर शहरात कोरोनाचा कहर वाढल्याने जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय, मात्र हा कर्फ्यू बाजरपेठेला लागू असताना सुद्धा याठिकाणी नागरिक बिन्दास्तपणे फिरत असल्याचे चित्र पहायला मिळालं आहे. प्रशासनाकडून कारवाई केली जात असली तरी ती मागील वर्षासारखी नसल्याने नागरिकांच्या मनात प्रशासनाची भीतीच नसल्याचे यावरून स्पष्ट झालं आहे.

५. डॉक्टरांचे जिल्हाधिका-यांना निर्वाणीचे पत्र
नगर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी आता त्यांच्या स्तरावर ऑक्सिजन जनरेशन प्लँटची  उभारणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिलाय.  त्यामुळे शहरातील डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *