१8 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - पंतप्रधानांच्या विनंतीचा मान राखत कुंभ मेळ्याबाबत मोठा निर्णय.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते
मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात बोलत होते
2. कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधानांचे प्रशासनाला महत्वपूर्ण आदेश
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन शनिवारी उशीरा कोविड आढावा बैठक घेतली. त्यामध्ये कोरोनावर उपाययोजना करताना आणि लसीचे उत्पादन वाढवताना देशातील उपलब्ध क्षमतेचा पूर्ण वापर करा.
3. नाशिकमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्याची महापौरांची मागणी
काही दिवसांपूर्वीच राज्यात संचारबंदीचे नियम लागू झाले. याशिवाय प्रवास आणि दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहारांवरही निर्बंध आले. कोरोना विषाणूचं संकट आणखी बळावत असल्यामुळं प्रशासनानं हा निर्णय़ घेतला. नागरिकांकडून वारंवार कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं होणारं उल्लंघन पाहता, सरकारनं आता थेट कडक लॉकडाऊनचा इशाराही दिला आहे.
4. पंतप्रधानांच्या विनंतीचा मान राखत कुंभ मेळ्याबाबत मोठा निर्णय
हरिद्वार येथे सुरु असणारा कुंभ मेळा मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरू शकतो. ही बाब लक्षात घेत आरोग्य अधिकारी ते थेट राजकीय नेतेमंडळींपर्यंत सर्वांनीच कुंभ मेळा प्रतिकात्मक स्वरुपात साजरा का केला जात नाहीय, हा प्रश्न उपस्थित केला आहे.
5. कोरोना रुग्णांना आता बेड मिळेपर्यंत उन्हात थांबायची गरज नाही
येथील सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालय बारामती याठिकाणी उपचाराकरिता कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. त्यातच उन्हाचा पारा देखील दिवसेंदिवस वाढत आहे.
6. रायपूरमध्ये हॉस्पिटलला आग, 5 जण दगावले,
कोरोनाचे संकट कमी होते म्हणून की काय, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका हॉस्पिटलला आग लागली आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
7. गैर भाजपा सरकारशी मोदी सरकारकडून भेदभाव
देशभरात कोरोनाचं संकट वाढलं असून अनेक राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक बोलावून त्यात देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
8. अखेर लालूंना जामीन, 42 महिने 11 दिवस तुरुंगात काढल्यानंतर बाहेर येणार
दुमका कोषागार घोटाळ्याप्रकरणी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना अखेर जामीन मिळाला आहे. रांची उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे 42 महिने 11 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर लालूप्रसाद यादव तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत.
9. जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश
नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल.
10. प्रचार रॅली आणि कोरोना संसर्गाचा काहीच संबंध नाही
कोरोना पळून गेला आहे, तोंडाला मास्क लावण्याची गरज नाही, अशी मुक्ताफळे उधळणारे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची बेताल बडबड सुरूच आहे. आता त्यांनी चक्क निवडणूक प्रचार रॅली आणि कोरोनाच्या संसर्गचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
Tags:
No comments
Post a Comment