Breaking News

1/breakingnews/recent

१8 एप्रिल सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री नितेश राणेंची ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दांत टिका...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. रेमडेसिवीरच्या किंमती घटल्या
राष्ट्रीय औषध निर्धारण प्राधिकरणाने शनिवारी सांगितलं की सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषधं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रेमडेसिवीरच्या किंमतीत घट केली आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन महत्वाची भूमिका बजावते. सरकारने रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची एक बैठक घेतली. 

2. पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द
देशात करोनाचा कहर वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु असताना राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

3. २४ तासांत दीड हजार मृत्यू
  नव्या म्युटेशनमुळे करोना संक्रमणाचा प्रसार वाऱ्यासारखा होत असून, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असतानाच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. 

4. नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 

5. नितेश राणेंची ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दांत टीका,
रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक कंपनीच्या (bruck pharm) मालकाची मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता 50 हजार रेमडेसिव्हीर जनतेसाठी स्वत:च्या ताकदीवर आणून दाखवा, नाहीतर स्वत:ला मर्द म्हणणं तरी बंद करा.

6. अती शहाणा त्याचा हळदीत ‘बैल’ रिकामा,
कल्याण-ठाणे-डोंबिवलीत कोरोनाचा एवढा मोठा स्फोट झालाय की ना बेड मिळतायत ना ऑक्सिजन तरीही लोक मात्रस्वत:च्याच मस्तीत असल्याचं दिसतं आहे. कल्याणच्या एका हळदी कार्यक्रमात चक्क बैल नाचवले आणि त्यासाठी मोठी गर्दीही जमली काही व्हिडीओ या हळदी कार्यक्रमाचे व्हायरल झाले. त्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. प्रशासकीय यंत्रणाही जागी झाली. 

7. पुण्यात कडक लॉकडाऊन
पुण्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला असून संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेतली दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. 

8. पुण्यात कोरोनाने अख्खं कुटुंब संपवलं,
कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

9. रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यास दुर्लक्ष
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसह इतर औषधांचा तुटवडा जाणवत आहेत. मुंबईसह राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *