Breaking News

1/breakingnews/recent

१8 एप्रिल Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - कुंभमेळ्यात प्रतीकात्मक सहभागी होण्याचे मोदी यांचे आवाहन........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. कुंभमेळ्यात प्रतीकात्मक सहभागी होण्याचे मोदी यांचे आवाहन
करोना संकटामुळे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात  सहभाग प्रतीकात्मक ठेवण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. आता दोन शाही स्नान पार पडले आहेत. त्यामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक पद्धतीने  साजरा करावा, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. 

2. पूर्ण क्षमतेने लसनिर्मिती करा : पंतप्रधान
भयावह वेगाने फैलावणाऱ्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्वसनयंत्रे, प्राणवायू आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. 

3. रेमडेसिवीरच्या किंमती घटल्या
राष्ट्रीय औषध निर्धारण प्राधिकरणाने शनिवारी सांगितलं की सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषधं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रेमडेसिवीरच्या किंमतीत घट केली आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन महत्वाची भूमिका बजावते. 

4. राज्यात 67, 123 कोरोना बाधित रुग्णांची
राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे.  67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. 

5. लॉकडाऊनच्या  नियमांचा फज्जा  
शासनाने कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी निर्बंध घातलेले असतानाही गंगापूर शहरात विनाकारण,विनामास्क फीरणाऱ्या नागरिकांची रेलचेल दिसत आहे.यामुळे कोरोना संसर्गाची भीती कायम आहे. 

6. साडे आठ लाखाचा घोटाळाकरणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या पंढरपूरातील सम्राट अशोक विद्यालयालयास शासनाकडून प्राप्त झालेल्या वेतनोत्तर अनुदानात जवळपास साडे आठ लाखाची अफरा-तफर करुन शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

7. विजेचा  धक्का लागूनझिरो वायरमन जखमी
  औरंगाबाद वाळूज गावात विजेच्या खांबावर काम करण्यासाठी चढलेल्या झिरो वायरमन विजेच्या धक्याने खांबावरुन पडून गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी वाळूजच्या बाजारतळाजवळ घडली. या अपघातात गणपत विठ्ठल पटेकर हे  झिरो वायरमन जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

8. कोविड केअर सेंटरची आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी केली पाहणी
अंबरनाथ शहरात नवीन 660 खाटांचे कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होणार असून त्या सर्व कोविड केअर सेंटरची अंबरनाथ चे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी अधिकायासोबत पाहणी करुन काम जलदगतीने पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

9. 27 गावातील पाणी समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा
कल्याण ग्रामीणमधील 27 गावात अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा प्रश्न आहे या गावांमध्ये केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. काही भागात काम संपुष्टात आले आहे. माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते एका ठिकाणी लोकार्पण कार्यक्रम पार पडला.

10. संचारबंदी सुरु असताना हळदी समारंभात गर्दी
राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही असा सवाल काही घटनांमुळे उपस्थित होत आहे. कुठे आठवडा बाजार, कुठे बारमध्ये बसून मद्यपान केले जात आहे. आणि आत्ता तर मोठय़ा जल्लोषात हळदी सभारंभ आयोजित करण्यात आला. या हळदी सभारंभात बैल नाचविले गेले. त्यावर पैशाची उधळपट्टी करण्यात आली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *