Breaking News

1/breakingnews/recent

१6 एप्रिल सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, 9000हुन अधिक स्पेशल ट्रेनला मंजुरी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. भाजपचे स्विकृत नगरसेवक आनंद गायकवाड धावले; अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला
लातूरात दिवसागणिक 10-15 जनावर अंत्यसंस्कार केले जातात अशातच महानगरपालिकेचे कर्मचारी जीवाची कसलीही परवा न करता कोरोना बाधित रुग्णांवर अंत्य संस्कार करता ; कसल्याही प्रकारची पिपीई किट नाही, ना कोरोणा पासून बचाव करण्यासाठी कसल्याच प्रकारची साधन सामग्री, अशाच परिस्तिथी महापालिकेचे कर्मचारी नित्य नियमाने हे काम करतात. 

2. देशात कोरोनाबाधितांच्या वाढीची लाट
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाने महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली पाठोपाठ देशातील इतर राज्यांतही हातपाय पसरले असून, झोप उडवणारी आकडेवारी दररोज समोर येऊ लागली आहे. 

3. स्मार्टफोनचा अतिवापर करताय. सावधान
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शाळा आणि 'वर्क फ्रॉम होम' सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदारांचा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. अगदी मधल्या वेळेत करमणुकीसाठीदेखील टॅब, स्मार्टफोनचा वापर होत असल्याने कोरोना काळात स्क्रीन टाइम जवळपास दुप्पट म्हणजे तीन तासांवरून पाच तासांपर्यंत वाढल्याचे एरिक्सन मोबिलिटीच्या अहवालातून पुढे आले आहे.

4. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर चोवीस तासांत 1 हजार 395 पाॅझिटीव्ही
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली असून काल दिवसभरात मृत्यूचा आकडा वाढल्याने स्मशानभूमी कमी पडली होती. 

5. कोरोनामुळे राज्यात भयावह परिस्थिती निर्माण
कोरोनामुळे राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन अशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर येत आहेत. अशातच नाशिकमधून आणखी एक धक्कादायक माहिती  समोर आली आहे. 

6. मुकेश अंबानी यांनी यासाठी कोणतंही शुल्क आकारलेलं नाही
महाराष्ट्रात करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. राज्यात रेमडेसिवीरचा तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

7. करोनामुळे सीबीआयच्या माजी संचालकांचं निधन
सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं करोनामुळे निधन झालं आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. 

8. प्रशासनाने माणुसकी दर्शवित केले अंत्यसंस्कार
येथील कोविड केअर सेंटरवर अत्यवस्थ  अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या ८५ वर्षीय कोरोनाग्रस्त  वृध्दाचा मृत्यू झाला. मध्यरात्री श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला. तालुक्यातील गायखेड येथील रहिवासी असनारया या ८५ वर्षीय वृध्दाचा एक मुलगा (४५) सुध्दा अत्यवस्थ असल्याने त्याला अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

9. राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना धन्यवाद
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एका बाजूला लसीकरणानं वेग धरला असताना दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. 

10. रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, 9000हुन अधिक स्पेशल ट्रेनला मंजुरी
रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने 70 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया अंतर्गत रेल्वे येत्या दोन आठवड्यात आणखी 133 गाड्या चालविण्याचा विचार करीत आहे. त्यापैकी 88 ट्रेन समर स्पेशल तर 45 ट्रेन खास उत्सवासाठी असणार आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *