१6 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - नितिन गडकरींचा नागरिकांना गंभीर इशारा.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. पंढरपूर येथे केवळ 38 तासांत उभारले कोव्हिड हॉस्पिटल !
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्राधान्याने पोलिस कर्मचाऱ्यांसाठी येथील पोलिस संकुलात अवघ्या 38 तासांतकोव्हिड ऑक्सिजन हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस वेल्फेअर फंड आणि देणगीदारांच्या माध्यमातून आवश्यक निधी जमा करून हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.
2. पावसाचा अंदाज आज जाहीर होणार
भारतीय हवामानशास्र विभागातर्फे आज आगामी पावसाळ्यात पावसाची स्थिती काय राहील, याबाबतचा अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. संस्थेतर्फे आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात याबाबत माहिती दिली जाणार आहे.आयएमडीतर्फे दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पावसाळ्याबाबत संकेत दिले जातात.
3. वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मुलाची नैराश्येतून आत्महत्या
राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. सोलापुरात अशीच एक नैैराश्यातून मुलाने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.
4. कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरु
देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे देशात लोकांनी या महामारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यातच कुंभमेळ्यात कोरोनाचा महाउद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5. टाळेबंदीची आर्थिक किंमत
देशात एकेका दिवसात दीड लाख करोना रुग्ण आढळत असून, एकूण रुग्णांची संख्या दीड कोटीच्या पार गेली आहे. कोविड संसर्गातून बरे होण्याचा दर 90 टक्क्यांच्या खाली गेला आहे. लागोपाठ महिनाभर रुग्णसंख्येत वाढच होत असून, सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या बारा लाखांवर गेली आहे. जर ही स्थिती बदलली नाही.
6. नितिन गडकरींचा नागरिकांना गंभीर इशारा
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नॅशनल कॅसर इंन्स्टिट्युट कोव्हिड सेंटरचे उद्घाटन केलाय .या कार्यंक्रमात संबोधित करताना त्यांनी लोकांना कोव्हिडच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल नागरिकांना सत्रकतेचा इशारा दिला.
7. घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू-राजेश टोपे
ज्या रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे, ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी नियम पाळले नाहीत तर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करू आणि त्याचा खर्च देखील त्यांनाच करावा लागेल.
8. निवडणूक आयोगाची आज सर्वपक्षीय बैठक
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांत देखील चिंताजनक वाढ होत आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूका सुरू असून निवडणूक प्रचार सभेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाताना दिसतेय. प्रचारसभेदरम्यान मोठ्या संख्येने गर्दी केली.
9. फेरनोंदणी न झालेल्या 4.5 लाख कामगारांनाही मिळणार मदत
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत तातडीने पोहोचविण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.तसेच राज्य शासन येत्या काळात कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोशल ऑडिट करण्यास सकारात्मक आहे.
10. कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू-कपिलदेव, सचिन तेंडुलकर यांचा विस्डेन यांच्या कडून गौरव
'टीम इंडिया'चा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात काल आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. 'विस्डेन अलमॅनाक'ने त्याची 2010 ते 2020 या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली. याचबरोबर कपिलदेव यांचा 80 च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, तर सचिन तेंडुलकरचा 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे.
Tags:
No comments
Post a Comment