१6 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - किराणा मर्चंट असोसिएशनच्या व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊनचा निर्णय...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना
चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड केअर सेंटर करिता कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर मेडिकल ऑफिसर नर्स आदीसह 241 पद मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
२. पारनेर मध्ये कराटे क्लास चालकावर कारवाई 10000/- रू. दंड
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या कडक निर्बंधाची तालुक्यात अंमलबजावणी सुरू झाली असून पारनेर शहरात विनापरवानगी कराटे क्लास घेणाऱ्या चालकास तर मुलांना क्लासला पाठवणाऱ्या पालकांनाही दंड करण्यात आला आहे.
3. रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच
कोविड रुग्णांचा सीटी स्कॅन स्कोअर जास्त असेल तर डॉक्टर रेमडेसिविर इंजेक्शन सुरू करतात. मात्र, या इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्हा प्रशासनाने ही इंजेक्शन आता केवळ कोविड सेंटरमध्ये मिळतील असे धोरण जाहीर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या हॉस्पिलमध्येही ही इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी करत आहोत.
4. नेवासा तालुक्यात तीन दिवसात आढळले २९१ कोरोनाबाधित
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे. अशातच कोरोना खेडेगावात व वस्त्यावर पोहोचला आहे. गुरुवारी तालुक्यातील ३२ गावांमध्ये १३१ कोरोना रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्यातील अवघ्या १५ दिवसामध्ये तालुक्यातील ७० ते ८० गावांना कोरोनाने विळखा घातला.
5. दैनंदिन रुग्णसंख्येचा नवा उच्चांक
जिल्ह्यात रोज सरासरी दोन हजार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गुरुवारी तब्बल ३ हजार ९७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंतच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा नवा उच्चांक झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेही चिंता व्यक्त केली असून उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ६९४ झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण ८५ टक्के असून गुरुवारी १८८५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
6. किराणा मर्चंट असोसिएशनच्या व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊनचा निर्णय
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची अतिभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोपरगाव तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाचे प्रमाण वाढत असून कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांनी शुक्रवार दि.१६ एप्रिल २०२१ पासून दुपारी ४.०० वाजेपासून ते सोमवार दि.१९ तारखेपर्यंत स्वतःची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवणार असून त्याप्रमाणे पुढील प्रत्येक आठवड्यात देखील मंगळवार, बुधवार व गुरुवार हे तीन दिवस सकाळी ८ ते दुपारी २.०० पर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोपरगाव किराणा मर्चंट्स असोसिएशन चे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली.
7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेमडीसीवीयरच्या एक्स्पोर्टला बंदी.. रेमडीसीवीयर समस्या सुटणार.. .खा.लोखंडे
अकोले तालुक्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिवराव लोखंडे यांनी अकोले येथे महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीसाठी तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक अभय परमार, नागरपंचायतिचे सी.ई.ओ विक्रम जगदाळे ,आरोग्य अधिकारी, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिन्द्र धुमाळ शहरअध्यक्ष नितीन नाईकवाडी, नगरसेवक प्रमोद मंडलिक, महेश देशमुख,उपस्थित होते.
8. आमदार रोहित पवार यांचा भाजप नेत्यांना सल्ला
केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण असल्याचे दिसते. या राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.
९. केशकर्तनालय दुकानदारांना राज्यशासनाने आर्थिक मदत करावी : कोल्हे
केशकर्तनालय व्यावसायिकांना दुकानदारीशिवायवाय पर्याय नसून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर सुरू आहे.
10. आ. काळेंच्या हस्ते मदतीचा धनादेश प्रदान
कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील रत्नमाला राजेंद्र शिलेदार यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कुटुंब कल्याण योजने अंतर्गत २० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील रहिवासी राजेंद्र शिलेदार यांचे मागील वर्षी निधन झाले होते. मृत राजेंद्र शिलेदार हे त्यांच्या कुटुंबात एकमेव कमावते व्यक्ती होते.
No comments
Post a Comment