Breaking News

1/breakingnews/recent

१6 एप्रिल Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची केली रॅपिड चाचणी........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. शिरपूर चे मुख्याधिकारी अमोल बागूल उतरले रस्त्यावर
शिरपूर शहरात कोरोना नियमांचे काटेकोर पालन व्हावे यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये या उद्देशाने काल शिरपूर वरवाडे परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागूल रस्त्यावर उतरून त्यांनी  लघु व्यवसायिकांसह आस्थापन धारकांना भेटून त्यांना कोरोनानियमांचे काटेकोर पणाने पालन करण्याचे आवाहन केले तसेच  शहरातील सुरु असलेल्या आस्थापन धारकांनी कोरोनाचे लसीकरण केली.

2. डोंबिवलीत आधीच कोरोनाच संकट त्यातच सायबर हल्ला...
डोंबिवलीच्या फडके रोड येथील आय.डी.बी.आय बँकेतून गुडीपाडवाच्या दिवशी अनेकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गेल्याची घटना घडली आहे.आधीच कोरोनाचे संकट त्यातच नववर्षाच्या पहिल्या दिवशी आय.डी.बी.आय बँकेत सायबर हल्ला झाल्यामुळे बँक खातेदारांना जबर फटका पडला आहे.

3. संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची केली रॅपिड चाचणी
महाराष्ट्र शासनाने दि 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत आणि  धारा १४४ लागू करण्यात आली आहे .त्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

4. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही केले लसीकरण
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काल सकाळी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लस घेतली. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यानी लसीकरणानंतर लस घ्यायला आलेल्या नागरिकांशी संवादही साधला. सर्व 45 वर्षाच्या पुढील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली पाहिजे. 

5. रांजणगाव येथील जि. प. शाळेमध्ये होणं कोविड व क्वारंटाईन सेंटर सुरु
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात कोरोना रुग्णांची होणारी वाढती लोकसंख्या चा विचार करून  रांजणगाव शेणपुंजी येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालल्याने प्रशासनाच्यावतीने गावातील नवीन जि.प.शाळेत कोविड व क्वारंटाईन सेंटर सुरु करण्याच्या तयारी सुरु केल्या आहेत.

6. राज्याचे  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  यांचे जनतेला आवाहन
राज्यात कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने निर्बंध लागु करण्यात आलेले आहेत. या काळात पोलिस प्रशासनाने  अधिकारांचा वापर संवेदनशीलपणे करण्याच्या सूचना दिल्या. 

7. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्यासाठी 6 समन्वय अधिकारी
कोविडबाधितांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन पुरवठय़ाची मागणीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेच्या वतीने 6 समन्वय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

8. हाफकिनला कोवॅक्सीन उत्पादनास मान्यता
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतर पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते.

9. कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा!
राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 

10. केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक सवलतींची घोषणा?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात सध्या सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. टाळेबंदीच्या भीतीने अनेक मजूर आपापल्या गावी निघाले आहेत. अशा परिस्थितीत रुळावर येत असलेली अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये, यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक सवलतींची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *