१5 एप्रिल सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - भाजपने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करावी...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. रेमडेसिवीरच्या वापराने मृत्यूदर कमी होत नाही- डॉ राहुल पंडित
रेमडेसिवीरमुळे करोनाचे मृत्यू टाळता येतात याचा कोणताही पुरावा आजवरच्या वैद्यकीय अभ्यासात आढळून आला नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही रेमडेसिवीरच्या वापरामुळे मृत्यूदरात कुठेही घट झाल्याचे आढळून आले नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
2. दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा
करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू लावत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
3. खासदार धैर्यशील माने यांचा सायकलवर प्रचार
बेळगावात लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने जोरदार ताकद लावली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शुभम विक्रांत शेळके हा 26 वर्षाचा तरुण लोकसभेच्या रिंगणात आहे. त्यासाठी शिवसेनेनेही जोर लावला आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी बेळगावात तळ ठोकला आहे.
4. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 30 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 30 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शासनाने संचारबंदी जाहीर केल्यानंतरही सोलापुरात अनेक नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय. त्यावर आता पोलिसांनी कारवाई करत 30 हून अधिक लोकांना ताब्यात घेतलंय.
5. भाजपने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करावी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक बाबींचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील भाजप सरकारने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करणे गरजेचे आहे.
6. भगीरथ भालकेंसाठी अमोल कोल्हेंची बॅटिंग
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. “कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे.
7. दाम्पत्य दोन वर्षांनी बाळासह कतारहून मुंबईला
कतारमध्ये हनिमूनसाठी जाताना ड्रग्ज प्रकरणात ‘बळीचा बकरा’ ठरलेले मुंबईतील दाम्पत्य अखेर मुंबईत परतले आहे. ओनिबा आणि मोहम्मद शरीक कुरेशी तब्बल दोन वर्षानंतर मायदेशी आले. तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या मुलीसह त्यांची घरवापसी झाली.
8. बसमध्ये उभ्या प्रवाशांना बंदी
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात सार्वजनिक वाहतुकीबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात लोकल ट्रेन, टॅक्सी, बस, रिक्षा चालकांना तसेच यातून प्रवास करणाऱ्यांसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे.
9. गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही बंद होणार
राज्यात लॉकडाऊन लागू करुनही बाजारपेठांमध्ये होणाऱ्या तुफान गर्दीमुळे आता राज्य सरकार अत्यावश्यक सेवाही बंदी करण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत.
10. औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप
पोलिसांच्या मारहाणीत औरंगाबादमध्ये सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काल उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. मात्र आता या घटनेत एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सलून चालक पोलिसांशी बोलत असतानाच अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे.
No comments
Post a Comment