शहराची खबरबात - 50 हजारांची लाच घेताना सहाय्यक निबंधक एसीबीच्या जाळ्यात
News24सह्याद्री - 50 हजारांची लाच घेताना सहाय्यक निबंधक एसीबीच्या जाळ्यात... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. पथदिव्यांची निविदा प्रक्रिया रखडली
शहरातील पथदिव्यांचा दुरुस्तीचा व देखभालीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मनपाने राबवलेली निविदा प्रक्रिया रखडली आहे एका ठेकेदार संस्थेने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे.
2. तारापूर मधील इंदिरानगर कंटेनमेंट
शहरातील तारकपूर परिसरात इंदिरा नगर वसाहत कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे या भागात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे महापालिकेने या परिसरात 26 एप्रिल पर्यंत निर्बंध जारी केले आहेत तसेच आवश्यकतेनुसार मनपाने छोटा कंटेनमेंट झोन जाहीर केला असून या भागातील सर्व अस्थापना अत्यावश्यक सेवा दुकाने वाहतूक व मनपाने बंद केली आहेत
3. नियोजनातील त्रुटी दूर करा अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
शहर कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होता हे रुग्ण संख्या व वेळेची उपलब्धता यात मोठी तफावत असल्याने रुग्णांची भटकंती सुरू आहे.
4. भाजीपाला दुधाची घरपोच विक्री करावी-महापालिका
शहरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने भाजी मार्केट मध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपाने मार्केट बंद केले आहेत विक्रेत्यांनी शहर व उपनगरातील इतर ठिकाणी चौकात तसेच नागरिकांच्या वसाहतीमध्ये घरोघरी जाऊन भाजीपाला फळे व दुधाची विक्री करावी असे आवाहन महापालिका प्रशासनाने केला आहे
5. 50 हजारांची लाच घेताना सहाय्यक निबंधक एसीबीच्या जाळ्यात
अहमदनगर येथील सहकारी संस्था अहमदनगर वर्ग-2 सहाय्यक निबंधक हे तक्रार दाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना काल कायनेटिक चौकात एका हॉटेल मध्ये रंगेहात पकडलेत ..अहमदनगर एसबी च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
No comments
Post a Comment