Breaking News

1/breakingnews/recent

१5 एप्रिल सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री पोलिस ठाण्याच्या कोठडीची खिडकी तोडून तीन कैदी फरार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. पोलिस ठाण्याच्या कोठडी ची खिडकी तोडून तीन कैदी फरार 
लातूर शहरात व औसा तालुक्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मागील काही दिवसांपूर्वी अटक केली होती त्यांना शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले असता आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हे तिघे जण कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन व्हेंटिलेशनची खिडकी तोडून पळून गेले.

2. ऑक्सीजन साठा लागत असेल तर आम्ही कमी पडू देणार नाही- शिक्षण मंत्री 
राज्यामध्ये दररोज 12000 हजार मेट्रिक टन हे ऑक्सीजनचे उत्पादन दरदिवशी होते. मात्र महाराष्ट्राला दिवसाला जवळपास 9000 हजार मेट्रिक टन ऑक्सीजण  हे दिवसागणिक महाराष्ट्राला लागतोय. त्यामुळे ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे, मात्र राज्य सरकार ऑक्सीजन बाबत नियोजन करत आहे. 

3. गोंदियात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरूनच साजरी
संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीने हादरून गेल्याने उत्सवा वर वारंवार देखील याचा फटका बसला असून काल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी या वर्षी कोरोनामुळे घरूनच साजरी करीत महामानवाला अभिवादन केले.

4. माजलगाव तालुक्यात खाद्यतेल युनिटला आग, लाखो रुपयांचे नुकसान
माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या फुले पिंपळगाव येथील नवीन मोंढ्यातील पॅकिंग करणाऱ्या युनिटला आज पहाटे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ही आग  चार तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली आहे यात सुदैवाने  कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

5. आणखी सात कंपन्या तयार करणार 'रेमडिसिव्हीर'
रेमडिसिव्हीर या इंजेक्शनची निर्मिती करण्यासाठी आता आणखी सात कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडवीय यांची आज गडकरींनी दिल्लीत भेट घेतली. या इंजेवशनचे उत्पादन आता १० लाख व्हायल प्रतिमाह याप्रमाणे 7 ठिकाणी बनविण्यात येणार आहे. 

6. नांदेडमध्ये ऑक्सिजनचा दुसरा टॅंक दाखल
नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. तर गंभीर रुग्णांना रेमडेसिवर यासह प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधी द्यावी लागत आहेत.

7. शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  यांनी ही माहिती दिली.शरद पवार यांना 11 एप्रिल रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 12 एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

8. कोरोनामुळे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने केली चिमुकलीसह आत्महत्या
हातावर पोट असलेल्या व पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणातुन आलेल्या एका कुटुंबाने आपली जीवन यात्रा क्षणार्धात संपवली.गाव गाव उदरनिर्वाह करणाऱ्या पतीला कोरोनाची लागण होताच योग्य उपचार मिळाला नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

9. "मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात स्थानिक प्रशासन मुजोर झालंय"
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका सलूनचालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या उस्मानपुरा येथे घडली. 

10. पुणे जिल्ह्यातील किल्ल्यावर सापडल्या 2 तोफा, शिवप्रेमींमध्येआनंद
जुन्नर तालुक्यातील किल्ले हडसर  येथील कमानी टाक्यातला गाळ काढत किल्ले संवर्धन करणाऱ्या तरुणांना दोन तोफा आढळून आल्या आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *