30 एप्रिल सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - 71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?
महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, मग दिल्लीला मागणीपेक्षा कमी का करण्यात आला यासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला आहे. दिल्लीला दिलेला ऑक्सिजनचा कोटा पुरेसा होता, हा केंद्राचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला असून केंद्राला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.
2. कोरोनामुक्त व्यक्तिंचा ढोल ताशांच्या गजरात स्वागत
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोनावर उपचार घेत असलेल्या 6 व्यक्ति कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करुन घरी सोडण्यात आले.
कोव्हीड 19 च्या उपचारासाठी सदर उपजिल्हा रुग्णालयात 6 व्यक्तीवर औषध उपचार करण्यात आला.
3. 71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू
71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या मेंढ्याचा मृत्यू झाला. मेटकरी कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. निमोनिया संसर्गानंतर उपचारादरम्यान सर्जा मेंढ्याचा मृत्यू झाला. तो अडीच वर्षांचा नर मेंढा होता. सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यातील चांडोलेवाडीत राहणारे पारंपरिक मेंढपाळ व्यावसायिक बाबुराव मेटकरी यांचा हा मेंढा होता.
4. लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन
लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय अँकर होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
5. विनाकारण घराबाहेर पडाल तर गाडी जप्त करून गुन्हे दाखल करू
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी ग्रामीण पोलिसांनी त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पासेस असणाऱ्यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी अत्यावश्यक सेवावगळता कोणालाही पंढरपूर शहर व जिल्ह्यात फिरता येणार नाही,
6. अभिनेते रणधीर कपूर यांना आयसीयूमध्ये हलवले
करिना कपूर व करिश्मा कपूर यांचे वडील आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर सध्या कोरोनाशी झुंज देत आहेत. मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता 74 वर्षांच्या रणधीर यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
7. आरोग्य कर्मचारी महिलेला धक्काबुक्की,
लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी आरोग्य कर्मचारी महिलेला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोल्हापूर शहरातील फिरंगाई केंद्रावर घडला आहे. या प्रकरणी माजी उपमहापौर महेश सावंत यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8. सहा वर्षीय मुलीवर अत्याचार
मुंबईतल्या जोगेश्वरीच्या बेहराम बाग परिसरात एक सहा वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची घटना काल (29 एप्रिल) संध्याकाळी घडली आहे. सुनील सुखराम गुप्ता असे आरोपीचे नाव असून तो पीडित मुलीच्या घर मालकाचा मुलगा आहे.
9. संदीप पाठकच्या संकल्पनेतून माजलगावात रक्तदान शिबीर
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग भारतभर पाहायला मिळतो आहे. अनेक कलाकार आता कोरोनाच्या या लढाईत उतरले आहेत. काहींनी सोशल मीडियाची मदत घेऊन कोरोनासंबंधीच्या बातम्या लोकांना सांगायला सुरुवात केली आहे. मदत इकडून तिकडे पोहोचवायला सुरुवात केली आहे.
No comments
Post a Comment