30 एप्रिल Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा - अतुल भातखळकर........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा
मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची वारंवार मागणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्तीच आहे, असं म्हटलं आहे. आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
2. सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार
अतुल भातखळकर यांनी केली आहे.
3. मुंबईत पुढचे तीन दिवस लसीकरण बंद
कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने मुंबई महापालिकेला दैनंदिन लसीकरण मोहिमेचे काटेकोर नियोजन करुनही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सद्यस्थितीत उपलब्ध लससाठा संपुष्टात आल्याने उद्या 30 एप्रिल ते रविवार 2 मे असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे.
4. खा. जलील यांच्या कडून घाटी रुग्णालयाला 4000 सलाईन भेट.
औरंगाबाद येथिल कोवीड पेशंट ची वाढती संख्या पाहता, आरोग्य व्यवस्थेवर तान पडू नाही म्हणून,औरंगाबादचे खासदार ईम्तियाझ जलील यांनी घाटी रुग्णालयाला 4000 सलाईनच्या बॉटल दिल्या आहेत. ह्या सलाईनच्या बाँटल देण्यामागे फक्त रुग्णांची अडचन होऊ नये,
5. पुलाची दुरुस्ती करण्याची कामगार वर्गाची मागणी
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या देवगिरी नदीवरील पूल मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला होता. मात्र आता पर्यंत या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने कामगारांना कामाँवर जाण्यासाठी ४/५ किलोमीटर फेरा मारून प्रवास करावा लागत आहे.
6. डोंबिवलीत राष्ट्रवादी तर्फे गरिबांसाठी अन्नदान सेवा
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनकडून लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली सर्वत्र लॉकडाउन सदृश परिस्थिती असल्याने गरिबांचे व हात वर पोट असलेल्याचे रोजगार बंद पडले आहेत.कोणतेही व्यक्ती अन्नापासून वंचित राहूनये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने लॉकडाउन लागल्या पासून गरीब व गरजवंतांन साठी डोंबिवली मध्ये दरोरोज वेगवेगळ्या भागात जाऊन अन्नदान करत असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव तेजस पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.
7. सहा महिन्यांपासून गुंगारा देणार सराईत गुन्हेगार अखेर गजाआड
एन्टी नार्कोटिक सेलसह मुंबई ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला महात्मा फुले पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. विशेश म्हणजे हा आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता .रहमत युसुफ पठाण असे या आरोपीचे नाव आहे.
8. निलंगा पोलिसांनी पकडला 27 लाखांचा गुटखा.
दिवसेंदिवस कोरोनाचा थैमान वाढत आहे त्यातच सरकार या वर उपाययोजना करण्यात व्यस्त असताना आज उदगीर मोड येथे निलंगा पोलिसांनी 27 लाखांचा गुटखा पकडला आहे. औरद शहाजनिकडून नीलांग्यकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाली. ट्रक चालकाची विचारणा केली असता तपासा अंती ट्रक मध्ये गुटखा वाहतूक करत असल्याचे समोर आले.
9. खासगी रुग्णालयात प्राणवायू गळती
विजय वल्लभ रुग्णालयातील घटनेची पुनरावृत्ती नालासोपारा येथील एका खासगी रुग्णालयात टळली. या रुग्णालयात अतिदक्षता विभागात प्राणवायूवाहिनीची गळती होऊन बिघाड झाला होता. रुग्णालयाने प्रसंगावधान दाखवत उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने इतर रुग्णालयांत स्थलांतरित केल्याने रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
10. कोरोना मृतांचे वैद्यकीय परीक्षण :
खासगी रुग्णालयांत संशयीत रुग्ण गेल्यानंतर त्याची करोना चाचणी करणे बंधनकारक असताना ती न करताच त्या रुग्णावर उपचार केले जात असून त्यात त्या रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा संशय पालघर जिल्हा प्रशासनाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खासगी रुग्णालयात झालेल्या मृत्यूंचे वैद्यकीय परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र प्रशासनाने संबंधित रुग्णालय प्रशासनाला दिले.
No comments
Post a Comment