29 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - लष्करी भागीदारीसाठी चीनचा बांगलादेशवर दबाव....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. स्वदेशी 'कोव्हॅक्सिन' ठरणार सुपरव्हॅक्सिन!
कोरणा विषाणू दिवसेंदिवस बहुरूपी सारखे वेगवेगळे रूप धारण करत आहे तो अधिकाधिक घातक होत चालला आहे या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी अमेरिकेतून आली आहे भारतात तयार झालेली स्वदेशी बनावटीची कोवॅक्सीन ही लस कोरोनाच्या 617 वेगवेगळ्या व्हेरियंट्सना मात देऊ शकते असा दावा अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार तसेच महामारी या विषयातील वरिष्ठ तज्ञ डॉक्टर ॲथोनी फॉसी यांनी केला आहे
2. लष्करी भागीदारीसाठी चीनचा बांगलादेशवर दबाव
चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फिंग यांनी अब्दुल हमीद यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केले दक्षिण आशियामध्ये बाहेर देशांच्या लष्करी वर्चस्व रोखायचे तर चीन आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत असे सिंग यांनी हमीद यांना उद्देशून सांगितले तर आता दोन्ही देशांमध्ये लष्करी सहकार्य वाढवण्याबाबत एकमत झाल्याचे वृत्त चीनच्या शिन्हुवा संस्थेने दिला आहे
3. सीरमने लसीची किंमत १०० रुपयांनी केली कमी
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लशीची प्रतिकुपी किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ही लस आता ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे ट्विट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केले आहे.
4. दक्षिण आशियाई हवामान आऊटलुक फोरमचा अंदाज
हवामान विभागाने यंदा मान्सून सर्वसाधारण ९७ ते १०४ टक्के पडणार असल्याची सुखद वार्ता नुकतीच दिल्यानंतर आता दक्षिण आशियाई हवामान आऊटलुक फोरमनेही दक्षिण आशियात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडील काही भागात सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
5. परमबीर सिंग यांच्यासह २७ अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती हि देण्यात आलीये
6. "ठाकरे सरकारची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण"
ठाकरे सरकारची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये लस विकतच मिळणार आहे. तसेच केंद्र सरकार कडून लस मिळत नसल्याचे रडगाणे सुरूच आहे. खुल्या बाजारातून किती लसी विकत घेणार आणि जनतेला मोफत देणार हे त्यांनी जाहीर करावे अशी माझी मागणी अतुल भातखळकर यांनी केलीये
7. कठोर निर्बंध १५ मेपर्यंत, पोलीसही घेणार कडक भूमिका
महाराष्ट्रात लॉकडाऊन म्हणावा तेवढा कठोरपणे पाळला जात नाही, असे अनेक जिल्ह्यात दिसत आहे. सकाळच्या वेळी भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी काळजी निर्माण करत आहे. त्यामुळे आहे तो लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवा, शिवाय तो आणखी कठोरपणे अंमलात आणा, अशा सूचना एकमताने सर्व मंत्र्यांनी दिल्या. त्याच बरोबर पोलिसांनी थोडा संयम कमी करून मोकाट फिरणाऱ्यांना बंधने आणली पाहिजेत.
8. महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारी
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
9. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक पोलिसांच्या ताब्यात
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अमरावती ग्रामीण क्राईम ब्रँचने काल उशिरा रात्री नागपूरहुन ताब्यात घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. अमरावती ग्रामीण पोलिस याबाबत मात्र कमालीची गोपनीयता बाळगून आहेत.रेड्डी याला ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी मंत्रालयातून रीतसर परवानगी घेतली. त्यानंतर काल नागपूर शहर पोलिसांच्या मदतीने रेड्डीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
10. खेळाडूंपाठोपाठ दोन अंपायर्सनी देखील घेतली माघार
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२१ ही स्पर्धा यंदा भारतातच आयोजित करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. मात्र यंदा भारतातच हा हंगाम घेण्याचे आयोजकांनी निश्चित केले होते. आयपीएल २०२१ स्पर्धा आता सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
No comments
Post a Comment