Breaking News

1/breakingnews/recent

29 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

  News24सह्याद्री - निघोज मळगंगा देवीची यात्रा रद्द...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  



TOP HEADLINES


1. तहसिलदार ज्योती देवरे यांची कारवाई 
सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन नियमावली कडक करून निबंर्ध लावले असतानाही टाकळी ढोकेश्वर मधील लोकांना मात्र याच  गांभिर्यच लक्षात येत नाही. काल तहसिलदार ज्योती देवरे , प्रांत आधिकारी सुधाकर भोसले आणि पोलिस निरिक्षक घनश्याम बळप यांच्यासह टाकळी ढोकेश्वरला भेट देत कारवाईचा बडगा उगाराला आहे. 

२. संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातुन रुग्णांचे आरोग्य जपण्यास मदत  
संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने सुरु केलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये उत्कृष्ट नियोजन केलेले असुन तेथे वैद्यकीय उपचार घेणा-या रुग्णांचे आरोग्य जपण्यास निष्चितच मदत होणार आहे. यासाठी संजीवनी समुहाचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा प्रातांधिकारी श्री. गोविंद शिंदे यांनी केलय.आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने सुरु केलेल्या कोविड सेंटरला श्री शिंदे यांनी भेट दिली.

3. मंत्री गडाख रस्त्यावर उतरले
कोरोनाने  स्वतःसह  कुटुंबीयांना ग्रासलेला असतानाही जीवाची पर्वा न करता कोरोनावर  दोन वेळा मात करत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पुन्हा एकदा  कोरोनायोद्धे  म्हणून जनतेच्या सेवेमध्ये उतरले आहेत ,वडील आणि भाऊ हॉस्पिटल मध्ये कोरोनाशी  झुंज देत असताना जनतेने दिलेल्या जबाबदारीचे भान राखत कोरोना बाधितांचे प्राण वाचवण्यासाठी मंत्री गडाख यांची धडपड वाखाणण्याजोगी ठरत आहे.

४. रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर : तनपुरे
राहुरी येथील नगर-मनमाड रस्त्यावरील पाण्याची टाकी परिसर रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याच भाग्यच उजळलं  आहे. या रस्त्यासाठी तीन कोटी 94 लाख 13 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्याचे नगरविकास आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली  आहे.

5. अकोल्यात जोरदार पाऊस
अकोले  तालुक्यामध्ये काल संध्याकाळी साडेसात वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे काही तास वीज खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. संध्याकाळी चार पासून पावसाचा वातावरण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल प्लास्टिक कागदाने शेतीवरच झाकून ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले होते.

6. कोपरगाव शहरात ८ दिवस कडकडीत जनता संचारबंदी  
येत्या शनिवारपासून कोपरगाव शहरात ८ दिवस कडकडीत जनता संचारबंदी लागू करण्याचा  निर्णय पालिकेच्या वतीने घेण्यात आलला  असून नगरपालिकेतील प्रभाग निहाय कोरोना सुरक्षिततेच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 

७. संगमनेरचा भाजीबाजार उठवला
संगमनेरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाल्लायने शासनाने कडक पावले उचलली आहेत. यावेळी संगमनेर शहरातील डीएड कॉलेजजवळ भरणारा भाजीबाजार  देखील पोलिसांनी उठवून  लावलाय. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी हि कारवाई केलीय.    

८. कर्जतमध्ये सामाजिक संघटनांचा मदतीसाठी पुढाकार
कर्जतमधील सामाजिक संघटना कोरोनाच्या काळातसुद्धा सामान्य जनतेची सेवा करताना दिसत आहेत. याच पार्शभूमीवर कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात काल स्वच्छता करण्यात आलीय. तर नागरिकांच्या माहितीसाठी माहिती फलक लावण्यात आलेत. या संघटना मागील २०० दिवसापासून श्रमदान करून परिसराची स्वछता करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

९. मळगंगा देवीची यात्रा रद्द
श्रीक्षेत्र निघोज येथील मळगंगा देवीची यात्राकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून भाविकांनी याची नोंद घेऊन यात्रा किंवा दर्शनासाठी निघोज मध्ये येऊ नये असे आवाहन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, ग्रामस्थ आणि कुलाबा मुंबईकर मंडळाने केल आहे.

१०. गुप्तधनासाठी जुन्या वाड्यात खोदकाम
श्रीगोंदा शहरात मध्यवस्तीमध्ये एका ३०० वर्षे जुन्या असणाऱ्या वाड्यामध्ये गुप्तधनासाठी  एका अज्ञात व्यक्तीने खोदकाम केल्याची माहिती समोर आलीय. हा प्रकार उघड झाल्यावर हे खोदकाम करणारे पळून गेलेत. गुप्तधन काढण्यासाठी वाड्यातील खोदकामाच्या घटनेने शहरात खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाल आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *