29 एप्रिल सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. रेमडीसीवीर साठ्यात ४८ इंजेक्शनची चोरी
औरंगाबाद मनपा मुख्य औषधी भांडार यांच्या कडून २३एप्रिल रोजी मेलट्रॉन रुग्णालयास रेमडीसीवीर इंजेक्शन च्या २६ बॉक्स चा पुरवठा करण्यात आला होता. महापालिकेने बंगळुरू येथील मायल्यान कंपनीकडून १० हजार रेमडेसिवीरची खरेदी केली होती. या प्रत्येक बॉक्स मध्ये रेमडेसिविरचे ४८व्हायल्स आढळून येतात मात्र शेवटच्या बॉक्स मध्ये रेमडेसिविरचे इंजेक्शन नसल्याचे दिसून आल्याने त्या बदली दुसरेच इंजेक्शन असल्याचे दिसून आले .
2. जिल्हाधिकारी यांच्याकडून विविध ठिकाणी आरोग्य सुविधाची केली पाहणी
औरंगाबाद वाळूज औद्योगिक परिसरात आज बुधवार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन आरोग्य सुविधाची माहिती घेतली. या पाहणीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधत स्थानिक लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयाना विविध सुचना दिल्या.बजाजनगर-वडगावा येथील आरोग्य उपकेंद्र्राला बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भेट दिली.
3. वाळूजच्या मसिआ सभागृहात २२१ जणांना लसीकरण
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी मध्ये मसिआ सभागृहात कामगार व उद्योजकासाठी मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय शिबीरात २२१ जणांना लसीकरण करण्यात आले.सध्या कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगार व उद्योजकात घबराटीचे वातावरण पसरले आहेत. कोरोना चा धोका टाळण्यासाठी शासनस्तरावरुन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
4. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असल्याने आपल्यालाही लागण झाली असल्याची शक्यता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
5. “तात्काळ भारत सोडा,” अमेरिकेचा नागरिकांना संदेश
भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची भारताला कमतरता जाणवत असून अमेरिका, रशियासह अनेक देशांकडून मदत केली जात आहे. दरम्यान देशात रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणंही कठीण झालं असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितलं आहे.
6. दिल्ली आता नायब राज्यपालांची!
केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी ‘दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र दुरुस्ती कायदा’ अधिसूचित केल्यामुळे दिल्ली आता नायब राज्यपालांच्या अधिकारकक्षेत आली. दिल्लीतील राज्य सरकारच्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या अधिकारांना कात्री लागली असून नायब राज्यपालांच्या संमतीशिवाय कोणत्याही निर्णयाची दिल्ली सरकारला अंमलबजावणी करता येणार नाही. अनिल बैजल हे दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत.
7. कोरोनाला घाबरणाऱ्या लोकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी
करोना झाला किंवा करोना हे नाव ऐकूनच सध्या अनेकांना धडकी भरतेय…करोनामुळे दररोज मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या बातम्या ऐकूनच अनेकजण हॉस्पिटल नको रे बाबा..म्हणत आजार अंगावर काढतायत…करोनाला घाबरणाऱ्या लोकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे.
8. संघाच्या पदाधिकाऱ्याची टीका
दिल्लीत करोनाने थैमान घातले असताना मदतकार्यात सक्रीय सहभाग नसल्याच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली प्रांत कार्यकारिणीच्या एका सदस्याने दिल्ली भाजपवर जोरदार टीका केली आहे.
‘दिल्लीत सगळीकडे आग लागली आहे. अशा वेळी कुणा दिल्लीवाल्याने भाजपवाल्यांना पाहिले आहे का?’ असा प्रश्न संघाचे कार्यकारिणी सदस्य राजीव तुली यांनी ट्विटरवर विचारला.
9. राजीव सातव यांना करोनाची लागण झाली आहे
काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. राजीव सातव यांना करोनाची लागण झालेला असून पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत राजीव सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली आहे.
10. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी भाविक महीलांचे सातबहीणी मातेकडे साकडे
कोरोनामुळे देवाघरी जाण्याची वेळ येऊ नये म्हणून देवाची दारेच बंद करण्यात आली आहेत. तर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील भाविक महीलांनी कोरोनाचे संकट टाळण्या -करिता देवाकडे धाव घेतली. आणि रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान सात दिवस, महीलांनी मोहाडी येथील सातबहीणी या मातामायेच्या मंदिरात दररोज जावून, लिंबाच्या पानाने सात सुहासींची आंघोळ करून, तिचा सप्तश्रृंगार करित कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी, विनवणी केली.
No comments
Post a Comment