Breaking News

1/breakingnews/recent

28 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 

 News24सह्याद्री - कोणत्याही कारवाईला घाबरत नाही- खा. विखे...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  





TOP HEADLINES


1. कोणत्याही कारवाईला घाबरत नाही- खा. विखे
आपण जी रेमडेसिवीर इंजेक्शन आणली, त्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. इंजेक्शनमुळे ज्यांचे जीव वाचले, ते लोक माझ्या पाठिशी आहेत. आता ती इंजेक्शन संपली आहेत, त्यामुळे कारवाई आणि जप्त काय करणार? माझा तो व्हिडिओ नीट पाहिला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सांगून नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राजकीय आणि कायदेशीर वादाला उत्तर दिले. 

2. आमदार आशुतोष काळेंनी यांनी  दिले एक हजार टेस्टिंग किट
कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात आहे त्यामुळे आरोग्य विभागाला टेस्टिंग किटचा काहीसा तुटवडा जाणवत होता. कोरोना संकट आल्यापासून आमदार आशुतोष काळे आरोग्य विभाग व प्रशासनाला वेळेत सर्वोतोपरी मदत करीत आहे.

3. वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग  
संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे. संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील बाजूला वखार महामंडळाचे गोदाम आहे. या गोदामामध्ये धान्य, कापूस इत्यादी वस्तू साठवलेल्या असतात. 

4. गोव्याच्या दारुचा टेम्पो बाभळेश्वर येथे पकडला

गोव्यावरून रॉयल चॉईस कंपनीच्या दारुच्या बॉक्सने भरलेला आयशर टेम्पो काल श्रीरामपूर येथील दारु उत्पादन शुल्क विभागाने पकडला. रात्री उशिरापर्यत याप्रकरणी कारवाई सुरु होती. काल दुपारच्या सुमारास दारु उत्पादन शुल्कच्या विभागाने बाभळेश्वर चौकात थांबून एक संशयित आयशर टेम्पो चालला असता तो थांबविला. या टेेम्पोमध्ये रॉयल चॉईस कंपनीच्या दारुच्या बाटल्यांचे बॉक्स होते. 

5. पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर
 तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर दळणवळणाच्या सुविधा अधिक चांगल्या व्हाव्यात याकरिता रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ग्रामविकास विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती महसूल मंत्री थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.

6. मोटर सायकल चोरली
नगर तालुक्यातील चांदबिबी महाल जवळील रस्त्यावर उभी केलेली मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली. 25 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात महादेव पाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

7. मारहाण करून लुटले
 तालुक्यातील तिसगाव मीरी रोडवर जवखेडे फाटा येथे दोघांनी एकास मारहाण करून त्याच्याकडील 23 हजार रुपये काढून नेले. 25 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात शरद शहराम चितळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामनाथ नवनाथ वांढेकर आणि दादासाहेब नवथर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

8. फुफ्फुसांचा संसर्ग चाळीस जनावरे दगावली
कोरोनाने आणि कहर माजविला असतानाच आता जनावरांनाही संसर्गजन्य आजाराने घेरले आहे. गेल्या पंधरा दिवसात फुफ्फुसांचा संसर्ग होऊन चाळीस जनावरे दगावली असून अवघ्या पाच ते सहा दिवसात जनावरांचा मृत्यू होत आहे. विशेष म्हणजे लसीकरण झालेल्या जनावरांमध्ये हा आजार बळावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

9. आवश्यकता पाच हजारांची मिळतात हजार
 जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे ॲक्टीव रुग्णांची संख्या आता तेवीस हजारांच्या पुढे गेली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने नगर जिल्ह्यातील कोविड रुग्णालय हाऊसफुल झाले आहे. रुग्णांना  आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी दररोज सरासरी 5000 इंजेक्शन ची आवश्यकता आहे तरी डॉक्टर कडून ई-मेलद्वारे जिल्हा प्रशासनाकडे मागणी होत आहे.

10. अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोघांवर गुन्हा
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *