Breaking News

1/breakingnews/recent

27 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - सिंगापूरहून मुंबई विमानतळावर २६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दाखल....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. जो बायडन पंतप्रधानांची फोनवरुन चर्चा मोदींनी मानले आभार
अमेरिकेने भारताला मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.तर अमेरिकेकडून भारताला देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मी जो बायडन यांचे आभार मानले,' असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

2. 18 वर्षांवरील कोरोना लसीकरणावर विघ्न
महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारने आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचं जाहीर केलं आहे. परंतु मुंबई महापालिका 18 वर्षांच्यावरील नागरिकांना 1 मे पासून लगेच लस देणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

3. देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली;बरे होणाऱ्यांची वाढली
देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून साडे तीन लाखांवर हे रुग्ण सापडू लागले होते. मात्र, आजच्या आकड्याच तब्बल 29,847 घसरण झाल्याने दुसऱ्या लाटेत सापडलेल्या देशवासियांसाठी एक मोठा दिलासा ठरला आहे.

4. परमबीर सिंग यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याकडून गंभीर आरोप
 ठाण्याचे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाण्यात १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ पर्यंत पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करीत गुन्हेगारांना पाठबळ देऊन हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला.

5. सिंगापूरहून मुंबई विमानतळावर २६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दाखल
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे भारतात वैद्यकीय साहित्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे मित्रराष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 

6. 'नवी उमेद' हे समाजात सकारात्मकता पसरवणारे व्यासपीठ - डॉ. नीलम गोऱ्हे
अबोल राहून समाजासाठी काम करणाऱ्या न लिहित्या, बोलत्या माणसांच्या यशकथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करत 'नवी उमेद' हे समाजात सकारात्मकता पसरवण्याचे व्यासपीठ बनले आहे, अशा शब्दात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.

7. पुण्यातून हवाई वाहतूक सुरू राहणार;विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द
धावपट्टीचे नूतनीकरण करायचे असल्यामुळे २६ एप्रिल ते ९ मे दरम्यान लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द झाला आहे. त्यामुळे सध्याच्या काळातही विमानतळावरून वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, या निर्णयाची माहिती प्रवाशांना नसल्यामुळे काल १० विमानेच विमानतळावर आली आणि रवाना झाली. 

8. ऑक्सिजनचा इमर्जन्सी बॅकअप ठेवा; आमदारांच्या सूचना
ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने रुग्ण दगावण्याची शक्‍यता असल्याने अंबरनाथ शहरातील खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची महत्त्वपूर्ण बैठक अंबरनाथ नगरपालिकेत घेण्यात आली. या बैठकीला आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी खाजगी काेविड रुग्णालयांना इमर्जन्सी बॅकअप ठेवण्याच्या सूचना दिल्या.

9. शक्य तेवढी मदत करतोय :WHO
भारतात कोरोनाचा कहर वाढला असून गेल्या आठवड्याभरात दर दिवशी तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी काल भारतातील कोरोनाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. 

10. सामना झाल्यानंतर केकेआरच्या कर्णधाराचे हृद्यास भिडणारे भाष्य
ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने काल झालेल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत पंजाब किंग्ज संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मॉर्गनने नाबाद ४७ धावांची खेळी केली होती. याच खेळीच्या जोरावर मॉर्गनला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *