27 एप्रिल सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
१. कडक लॉकडाऊन ठरला असरदार!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत होती. दिवसाला ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत होती. पण आता कडक लॉकडाऊनचा चांगला असर पडताना दिसत आहे. आज मुंबईसह राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली
२. फोन टॅपिंग प्रकरणी सनदी अधिकारी रश्मी शुक्लांचा जबाब
फोन टॅपिंग प्रकरणी तपासाला आता वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकरणी आता सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले असून मुंबई सायबर पोलिसांनी शुक्ला यांना हे समन्स बजावले आहे. बुधवारी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
३. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक
पेट्रोल डिझेलच्या किंमतीतील वाढ आता थांबली आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मंगळवारी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर सलग 12 व्या दिवशी स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.40 रुपये आहे.
४. रशियाची स्पुतनिक वी लस भारताला मिळणार
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना भारताला करावा लागत आहे. देशभरात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याला भारताला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं काही दिवसांपूर्वी रशियाच्या स्पुतनिक वी या लसीला भारतात मंजुरी दिली आहे.
५. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र
आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी मीडियात ज्या पद्धतीने भारताचं चित्र निर्माण केले जात आहे. त्यातून भारताचे सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे हे मोठं षडयंत्र असू शकते, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
६. केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील'
येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. यादरम्यान लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी लसीच्या किंमतीची घोषणा केली असून लसींच्या किमती वेगवेगळ्या जाहीर केल्या आहेत. यावरून राजकारण तापले आहे.
७. 24 तासांनंतर व्हॉट्स अॅप मेसेज आपोआप गायब होणार
अधूनमधून हटके फिचर्स लॉन्च करणाऱ्या व्हॉट्स अॅपने आता आणखी एक नवीन फिचर समाविष्ट केले आहे. फेसबुकचा मालकी हक्क असलेल्या या इस्टंट मेसेजिंग अॅपवर आता 24 तासांत मेसेज आपोआप डिलीट होणार आहेत. नवीन फिचर अॅण्ड्रॉईड,IOS तसेच वेब वरही काम करणार आहे.
८. हॉटेलच्या किचनमध्ये लपवले रेमडेसिविर
कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार अद्यापही सुरुच आहे.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने गोरेगावात कारवाई करून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा हस्तगत केला.
९. आज सुपरमून दिसणार!
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 27 एप्रिल रोजी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात सुपरमून दिसणार आहे. त्यामुळे मंगळवारी चैत्र पौर्णिमेचे चंद्रबिंब 14 टक्के मोठे व 30 टक्के जास्त प्रकाशित दिसेल.चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. महिन्यातून तो एकदा पृथ्वीजवळ येतो व एकदा दूर जातो. मंगळवारी चंद्र पृथ्वीजवळ तीन लाख 73 हजार 379 किलोमीटर अंतरावर येणार आहे.
१०. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1200 रुपये दंड
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कोरोनासारख्या अनेक आजारांना निमंत्रण ठरत असल्याने अशा 'पिचकारी' बहाद्दरांना सध्या 200 रुपये करण्यात येणारा दंड 1200 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पालिका घेणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
No comments
Post a Comment