27 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - कामचुकारपणा केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. शेवगाव येथे 25 हजार रुपयांची मेडिसिनची मदत
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून स्वानंदसुखनिवासी सदगुरू जोग महाराज संस्कार केंद्र, आखेगाव ता.शेवगाव व परिसरातील सर्व भक्तीपीठातील जिवलग सांगाती च्या मदतीने ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय, शेवगाव येथे 25 हजार रुपयांचे मेडिसिन मदत करण्यात आली.
आज कोरोनामुळे ग्रामीण भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे.
2. कामचुकारपणा केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, तो रोखण्याकरिता संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आपल्याला माणसं जगविण्यासाठी मिशन मोडवर काम करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडावी. कामचुकारपणामुळे कुणाचा जीव जायला नको. असे झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
3. संजीवनी कोविड सेंटर मुळे तालुक्याला मिळाला दिलासा
कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जगासह, देश ठप्प झाला असुन राज्यातील जनजीवनही विस्कळीत झालेली आहे. कोपरगाव तालुक्यातील या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या परिस्थितीत रूग्णांना आॅक्सीजन, इंजेक्शन तसेच बेड उपलब्ध होत नाही, रूग्णांची व नातेवाईकांची मोठी हेळसांड होत असून अपु-या सुविधांअभावी उपचार घेणे जिकरीचे बनले आहे.
4. कोपरगावकरानो आता तरी बदला
शनिवार आणि रविवारच्या कडक संचारबंदी नंतर कोपरगाव चा सोमवार उजेडला तो भाजीपाला, किराणा आणि अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली शहर वासीयांनी तोबा गर्दी करत. या मोजक्या बेशिस्त नागरिकांन मुळेच तालुक्यात कोरोना चा हाहाकार माजवत असल्याचे चित्र समोर येत आहे.
5. बाजार समितीच्या वतीने कोविड सेंटर सुरु
महाराष्ट्रात कोरणा रुग्णांची संख्या वाढत आहे ही कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन बरोबर आयसोलेशन सेंटरची देखील गरज आहे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शंभर बेडची व्यवस्था केली असल्याचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितल आहे.
6. रेमडेसिवीर' डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका
देशभरात तुटवडा असताना दिल्लीहून खास विमानाने 'रेमडेसिवीर' इंजेक्शनचा साठा विनापरवाना आणणारे नगर येथील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
7. हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स ; महाराष्ट्र युवक काँग्रेसचा पुढाकार
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केलेल्या कोरोना हेल्पलाईनमध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ते फ्रंटलाइन वॉरियर्स आहेत, त्या सर्वांना रुपये 1 लाखपर्यंतचा मेडिक्लेम इन्शुरन्स पुरवण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केला.
8. कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची रिपोर्टसाठी झुंबड
संगमनेर शहरात दिवसागणिक शेकडोंच्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात एकट्या एप्रिल महिन्यात ४ हजार सातशे ५९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या साधी लक्षणे असलेला रुग्णही खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेला असता त्याला डॉक्टरांकडून सर्वप्रथम आरटीपीसीआर आणि एचआरसीटी या दोन चाचण्या करण्यास सांगण्यात येते.
9. आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून येणार २०० ऑक्सिजन निर्मिती यंत्र
जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजन सिलेंडरचा तुटवडा असल्याने आरोळे प्रशासन व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे आॅक्सिजनसाठी प्रयत्न सुरू अाहेत. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून आमदार रोहित पवार यांनी बाहेर देशातून दोनशे आॅक्सिजन मशिन मागवण्यात आले आहेत. २ दिवसांत या मशिन कर्जत व जामखेड येणार आहेत
10. श्रीरामपूरसाठी लवकर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार
आॅक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले अाहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा, तालुका पातळीवर आॅक्सिजनची गरज लक्षात घेऊन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार लवकरच श्रीरामपूर येथे आॅक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
No comments
Post a Comment