Breaking News

1/breakingnews/recent

26 एप्रिल सह्याद्री सुपरफास्ट

No comments

   News24सह्याद्री - भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


१. गुगल भारताला १३५ कोटींची मदत करणार -सुंदर पिचाई
भारतामधील करोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील काही दिवसांपासून रोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्यामुळे  जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरु झालाय. असं असतानाच माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. 

२. भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट
भारतात गेल्या २४ तासांत साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झालाय .भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत असल्याने  अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

३. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गाडीच्या टपावर बांधून स्मशानात नेला बापाचा मृतदेह
भारतामधील करोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक ठरल्याचे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.तसेच आरोग्यव्यवस्थाही कोलमडून गेली आहे .आता ऑक्सिजन बेड, औषधे याबरोबरच रुग्णवाहिकांचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे.

४.अनेक देशांचा भारताला मदतीसाठी हात
करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केलाय. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिलंय. 

५. इराक -अतिदक्षता विभागाला आग....८२ जणांचा होरपळून मृत्यू
इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून ८२ जण ठार तर इतर ११० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती इराकच्या अंतर्गत कामकाज मंत्रालयाने दिलीये .रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

६. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ९० लाखांचे फिक्स डिपॉसिट मोडले
राज्यात एकीकडे करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे.राज्य सरकारने करोनाशी लढण्यासाठी आमदारांच्या निधीतील रक्कम वापरण्याचाही आदेश दिलाय .... यादरम्यान हिंगोलीमधील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या बचतीचे बँकेतील तब्बल ९० लाखांचे फिक्स डिपॉझिट मोडून हिंगोलीतील एका औषध विक्रेत्याला मदत केल्याचे दिसून आलेय.

७. लॉकडाऊन करा; कुंभमेळ्यातील  तिसऱ्या शाहीस्नानाबाबत मागणी
 देशात कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. तर उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजित केलेल्या कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान चैत्र पौर्णिमेला पार पडणार आहे. यासंदर्भात पाच आखाड्यांनी कुंभमेळा समाप्त केल्याची घोषणा केली असली, तरी बैरागी आणि वैष्णो संप्रदायांचे आखाडे शाहीस्नानासाठी थांबले आहेत.

८. अजून एका राज्यात कडक लॉकडाऊन लागला
कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला जातोय . 

९.  ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा
संपूर्ण देशात कोरोनाची रुग्ण संख्या ही धक्कादायकी रीत्या वाढत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा ठरतोय . अशातच महाविकास आघाडी सरकारकडून लसीकरणाची मोठी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारकडून सुमारे 5.50 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

१०. विराटला १२ लाखांचा दंड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय . आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात बंगळुरूने षटकांची गती संथ राखली. ही पहिलीच चूक असल्याने विराटला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *