26 एप्रिल सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - काँग्रेस कार्यकर्त्यांचा हल्लाबोल, कार्यालयाची तोडफोड...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
१. बिना ई-पास भंडारा जिल्ह्यामध्ये प्रवेश निषेध
भंडारा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासन अॅकशन मोडमध्ये आले आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये, बिना ई-पास जिल्ह्यामध्ये प्रवेश मिळणार नसून, जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्हयाच्या चारही बाजुच्या सिमांवर जागोजागी सबंधित पोलिस स्टेशनअंतर्गत चेकपोष्ट लावण्यात आले आहेत.
२. पुढील 48 तासात वादळी पावसाचा शेतकऱ्यांना अलर्ट !
महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेने कहर केला असतानाचं अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. पुढील 48 तासात पावसाचा जोर आणखी वाढेल, अनेक ठिकाणी वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अवकाळीचा शेतपिकाला मोठा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने देशभरातील शेतकऱ्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
३. स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल
कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिक पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे.
४. सीए फाऊंडेशन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं सीए फाऊंडेशन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जून परीक्षेसाठी नोंदणी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना सीए मेंबर, गॅझेटेड ऑफिसर आणि शिक्षण संस्थाचे प्रमुख यांच्याकडून अर्ज साक्षांकन करण्याबाबत सूट देण्याचा निर्णय घेतलाय
५. PNB च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट करत असते. देशात आधीच कोरोनाचा संकट आहे. यातच बँकेने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. देशात डिजीटल पेमेंटमुळे ऑनलाइन फ्रॉडचा धोकाही वाढत आहे. बँकेने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली
६. घरातही मास्क घाला
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये अख्खं घरच पॉझिटिव्ह होत आहे. त्यामुळे घरात मास्क घालण्याचं आवाहन तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांचं ऐका. घरातही मास्क घाला, असं आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
७.काँग्रेस कार्यकर्त्यांचा हल्लाबोल, कार्यालयाची तोडफोड
राहुल गांधींची खिल्ली उडवणारी जाहिरात बनवणं एका कंपनी चांगलच महागात पडलं आहे. आपल्या नेत्याविरोधात कृती करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर आज युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी आंदोलनही करण्यात आलं. मुंबई युवकच्या कार्यकर्त्यांनी 'स्टोरिया' हे एनर्जी ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीच्या अंधेरीतील कार्यालयात घुसून तोडफोड केली.
८. भिवंडीत केमिकल गोदामाला लागली भीषण आग
भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम पट्यातील पूर्णा गावात असलेल्या सिमला कंपाऊंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या आगीत संपूर्ण केमिकल गोदाम जळून खाक झाले आहे. अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे .
९. लसींच्या किमतीवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. कोरोनाच्या परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस पाठवत राष्ट्रीय योजनेवर सविस्तर उत्तर देण्यास सांगितले होते.
१० .लस घ्यायची की नाही, हे खेळाडूच ठरवतील!
भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता IPL स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंबाबत BCCI काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.
No comments
Post a Comment