26 एप्रिल Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - कारखान्यांनी सोडलेल्या विषारी वायूमुळे नागरिकांना त्रास........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या घटली असली
देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत असली तरी राज्याचा रुग्णआलेख स्थिरतेकडे जात असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट नोंदविण्यात येत असून, पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरांतही रुग्णवाढ स्थिर असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
2. लशींबाबत केंद्राने हात आखडता घेणे अयोग्य -टोपे
केंद्राने महाराष्ट्रासाठी करोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा करताना हात आखडता घेणे योग्य नाही. ४५ वर्षे वयाच्या वरील सर्वांचे लसीकरण करावयाचे असेल तर राज्याला दररोज आठ लाख लशींची आवश्यकता आहे.
3. महाराष्ट्राला ४४ टन प्राणवायू
गुजरातमधून महाराष्ट्राला ४४ टन लिक्विड प्राणवायूचा पुरवठा होणार आहे. हा प्राणवायू तीन टँकरमधून रेल्वेच्या रो रो सेवेने सोमवारी कळंबोली येथे दाखल होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. यापाठोपाठ रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी प्राणवायूची वाहतूक करण्याचे नियोजनही के ले आहे.
4. संजय राऊतांची पंतप्रधानांवर खोचक टीका
कोरोनाच्या संकटावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. मंदीच्या लाटेने सगळेच गटांगळ्या खातील अशी स्थिती आहे. राज्यकर्ते आत्मसंतुष्ट व आत्मप्रौढीत मग्न असले की, हे असे होणारच! अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहेच.
5. प्लॅस्टिक भंगारच्या गोडावूनला आग लागून जदीड लाखाचे नुकसान
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी भागात आसलेल्या साजापूर येथील एका प्लॅस्टिक भंगारच्या गोडावूनला रविवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीच्या या घटनेत गोडावूनसह आतील सर्व भंगाराचे साहित्य जळून खाक झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. संपूर्ण गोडावूनच आगीच्या भक्षस्थानी सापडल्यानेही आग आटोक्यात आली नाही.
6. सिडकोतील कंदील हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी भागात आसलेल्या सिडकोतील कंदील हॉटेलवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासत लॉकडावूनचे नियम तोडून दारुविक्री करणार्या सिडकोतील कंदील हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
7. शासनाकडून चौकशी समितीची स्थापना
विरारच्या विजयवल्लभ या खासगी रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला १५ दिवसांत चौकशी करून अहवाल राज्य शासनाला सादर करायचा आहे.
8. अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार घेतले जातात!
पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला असून काही पालिका कर्मचारी खासगी व्यक्तींना हाताशी धरून पैसे खात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पालिका प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या गोऱ्या आणि लाकडं हे मोफत महानगर पालिकेकडून दिलं जात आहे.
9. कारखान्यांनी सोडलेल्या विषारी वायूमुळे नागरिकांना त्रास
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात विषारी वायू सोडल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात या वायूचा प्रंचड त्रास नागरिकांना होऊ लागला.
10. सलमान खानने घेतला मदतकार्याचा आढावा
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, वैद्यकिय कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठई दररोज चहा, नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे.
No comments
Post a Comment