25 एप्रिल सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - फक्त एका कॉलवर मागवा 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. ऑक्सिजन पुरवठ्याला अडथळा आणणाऱ्यांना फासावर लटकवू
वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळं ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. दिल्ली हायकोर्टने आज ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हायकोर्टानं म्हटलं आहे की, ही कोविडची लाट नाही तर सुनामी आहे.
2. पक्ष कार्यकर्त्यांनी लोकांची मदत करावी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येतंय. अशा परिस्थितीत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची कामं बाजूला ठेवावीत आणि लोकांना मदत करावी अशी सूचना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. दे
3. आता स्कूल बस मधून कोरोना रुग्णांचा मृतदेह नेण्याची वेळ
राज्यात शनिवारी तब्बल 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार 160 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 63 हजार 818 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढताना दिसत आहेत. राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 63928 इतकी झाली आहे. अमरावतीमध्ये देखील कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
4. सुजय विखेंनी विमानातून आणलेल्या बॉक्समध्ये काय होतं?
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी खास विमानाने नगरसाठी तब्बल दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणले होते. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संशय व्यक्त केला आहे. सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नक्की इंजेक्शनेच होती ना? की आणखी काही होते? असा संशय रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.
5. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यामुळे राज्यातील ऑक्सिजनच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता हवेतून ऑक्सिजन तयार करणारे 14 प्लांट उभारण्यात येणार आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पनवेल 12 महापालिका क्षेत्रात 14 ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभारले जाणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा पुढाकार घेतला आहे.
6. फक्त एका कॉलवर मागवा 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर
गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरेच कागदपत्र द्यावी लागतात. परंतु आता एलपीजी सिलिंडर मिळणे सोपे झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे.
7. मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेऊ नये, मेसेजमधील दावा खरा की खोटा?
केंद्र सरकारने येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार येत्या 1 मे पासून अठरा वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोना लसीबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. यात महिलांनी मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेऊ नये, असा दावा केला जात आहे.
8. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना बेड्या
सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत देखील उपलब्ध असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. सांगलीत देखील असा प्रकार समोर आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करत असल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रात्री दोघाना अटक केलीय.
9. मुंबईत केवळ 37 ठिकाणी लसीकरण सुरु
मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्राबाहेरही लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली. तसेच मुंबईत एकूण 37 ठिकाणी आज लसीकरण सुरु आहे.
10. 20 कोरोनाबाधितांचं रुग्णालयातून पलायन
राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंचावत असतानात आता हीच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पण, यवतमाळमध्ये यादरम्यानच एक मोठं संकट आलं आहे. जिल्ह्याच्या घाटंजी येथील कोविड केअर सेंटरमधून 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पलायन केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
No comments
Post a Comment