26 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजनइ - फडणवीस....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. दिल्लीत तपासण्या झाल्या कमी,घरीच उपचार करण्यावर भर
दिल्लीत कोरोना संक्रमणाचा दर एकूण तपासणीच्या ३३ टक्के कागदोपत्री दिसत असला तरी येथील स्थिती अत्यंत विदारक आहे. आजारी असलेले अनेक लोक कोरोना तपासणी करायला जात नाहीत. लक्षणे दिसली की घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्याही खूप आहे.
2. लसीचा कच्चा माल देण्यास अमेरिका तयार
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार असताना कोरोनाने कहर केला होता. यावेळी भारताने वेळोवेळी मदत केली होती. मात्र, आता भारतामध्ये कोरोनाने हाहाकार माजविलेला असताना अमेरिकेने मदत करण्यास नकार दिला होता. यामुळे अडचणीत आलेल्या जो बायडेन सरकारने लगेचच यू-टर्न घेत आताचा आमच्या मदतीची वेळ असल्याचे म्हटले आहे.
3. कृपा करा,दिल्लीला ऑक्सिजन द्या-केजरीवाल
अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या रेमेडिसिवीर बेड्स अभावी रुग्णांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली आहे. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंबानींसह देशातील बड्या उद्योगजकांना पत्र लिहिले आहेदेशातील या बड्या उद्योजकांना पत्र लिहून केजरीवाल ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात आवाहन केले आहे.
4. केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजनइ-फडणवीस
संपूर्ण देशभरात दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात चणचण भासू लागली आहे. परिणामी कोरोनाबाधिता रूग्णांचे हाल सुरू आहेत. तर ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील ठाकरे सरकार विविध उपाययोजना करत आहे.
5. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे याचिका दाखल- किरीट सोमय्या
कोरोनासाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमरता त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांची दमछाक झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या किंमतींना रेमडेसिवीर विकत घेण्याची ऑर्डर काढली आहे.
6. फडणवीसांकडून मोदींचे आभार
केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे मुंबईत जम्बो कोविड सेंटर उभारणार आहे.महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे.
7. राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र
देशातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू आणखीनच गंभीर होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. रुग्णांना उपचार घेण्यात अडचणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
8. विदर्भात कोरोनाला हरवणाऱ्या जिगरबाजांचे प्रमाण लक्षणीय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर स्वार होऊन आलेल्या 'डबल म्यूटंट'च्या सुनामीचा सामना करणाऱ्या विदर्भात रोज मोठ्या संख्येने नव्या बाधित रुग्णांची नोंद होत आहे. असे असले तरी दररोज मोठ्या हिंमतीने या रोगावर यशस्वी मात करणाऱ्या जिगरबाजांची संख्याही लक्षणीय आहे.
9. ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी १ कोटीचा निधी
ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने कोविड रुग्णालये सुरु करता येत नाही. कोविड रुग्णालये सुरु व्हावीत यासाठी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचे जाहिर केले आहे. इतकेच नाही आमदारांच्या मुलाचे लग्न आहे.
10. सीएसकेतील 'या' प्रमुख सदस्याची मालवली प्राणज्योत
वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यात चेन्नई संघाने ६९ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच चेन्नई संघाने गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठला आहे.
No comments
Post a Comment