Breaking News

1/breakingnews/recent

25 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - मुंबईला दिलासा! पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांनी घटला.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. भारतातून येणाऱ्या विमानांना परदेशात नो एन्ट्री!
कॅनडाने भारत व पाकिस्तानात कोविड-19 ची वाढती लक्षणे लक्षात घेऊन या देशांतील प्रवासावर 30 दिवसांसाठी बंदी आणली आहे. नुकतीच त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ब्रिटनमध्ये भारतीय व्यक्तीच्या प्रवेशासाठी 'रेड लिस्ट नियम' लागू केलाजाणार आहे.

2. 'ऑक्सिजन रोखणाऱ्याला आम्ही लटकवू-हायकोर्ट
देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रणाणात जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे महाराजा अग्रसेन हॉस्पिटलकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. शनिवारी या याचिकेवरील सुनावणीवेळी हायकोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले.

3. सुरतमध्ये हाहाकार! अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा.
सुरतमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला असून मृतांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत चार-पाच तास प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱया लाकडांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मृतदेह जाळण्यासाठी लाकडांबरोबरच उसाच्या चिपाडाचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

4. अखेर महाराष्ट्राला केंद्राकडून रेमडेसिविरचा जादा पुरवठा
देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि रेमडेसिविर मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. 

5. सरळसेवा भरती पुन्हा खासगी कंपन्यांमार्फत
राज्यातील सर्व पदभरतीच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. मात्र, राज्य सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष करीत आरोग्य विभागाची पदभरती परीक्षा आयटी कंपनीमार्फतच घेतली. या परीक्षेतही गोंधळ झाला. 

6. दहावीप्रमाणे बारावी परीक्षा रद्दच करण्याची मागणी
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, असे सांगण्यात आले; परंतु बारावीची परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, याबाबत राज्य सरकारने कोणतीही स्पष्टता अद्याप केलेली नाही. त्यामुळे बारावीच्या जवळपास १४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार कायम आहे. 

7. आंध्र प्रदेश महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर देणार
नागपूरसह महाराष्ट्रात सुरू असलेला कोरोनाचा उद्रेक पाहता व्हेंटिलेटर्स,रेमेडिसिवीर  आणि ऑक्सिजन तसेच अन्य औषधे मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नांतून त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांच्याकडे व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती.

8. मुंबईला दिलासा! पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांनी घटला!!
कोरोनाच्या दुसऱया लाटेत मुंबईत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना चाचण्यांच्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण घटल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.एप्रिलच्या 11तारखेला 52 हजार 159 चाचण्या झाल्या असताना तब्बल 9 हजार 989 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. 

9. पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार; ममता दीदींची घोषणा
देशभरातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असताना, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. 

10. सचिन देणार प्लाझ्मा
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काल आपल्या वाढदिवशी एक व्हिडिओ शेअर करत करोना परिस्थितीवरून प्लाझ्मा दान करणार असल्याची माहिती दिली. तसेच सर्वांना काळजी घेण्याचे आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.तसेच माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्‍टर्स आणि मेडिकल स्टाफ यांनी सर्वांनी मी बरा होण्यासाठी मदत केली. तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.असं तो म्हणाला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *