Breaking News

1/breakingnews/recent

25 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - ग्रामीण भागात कोरोनाविषाणूचा वाढतोय धोका...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


1. बालमटाकळी व बोधेगाव येथील ओढ्यावरील पुलाचे काम लवकरच करणार
 शेवगाव तालुक्यातील शेवगाव- गेवराई या राज्य महामार्गावर असणाऱ्या बालमटाकळी येथील पुलाला कठडे नसल्याने अनेकजण त्यावरून चालताना आपला जीव धोक्यात घालून वाहने चालवित आहे.  उसाने भरलेले ट्रॅक्टर व जड वाहनांना मोठी कसरत करावी लागत होती. 

2. १00 ऑक्सिजन बेड कर्यान्वित होणार आमदार आशुतोष काळे यांची पाहणी
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या तसेच ऑक्सिजन बेड ची कमतरता लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी पूर्वी 50 ऑक्सिजन बेड चा प्रश्न मार्गी लावला. मात्र रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चिन्ह दिसू लागल्याने 100 ऑक्सिजन बेडचा प्रश्न मार्गी लावून कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांना बाहेर गावी जावा लागणार नाही अशी व्यवस्था आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून करून रुग्णांच्या नातेवाईकांना आता धावपळ करावी लागणार नाही. 

3. संकटात अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये
कोणाच्या सांगण्यावरून शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील तर ते अजिबात खपवून घेणार नाही. आमचे राजकारण आम्ही पाहून घेऊ. तुम्ही या संकटकाळात राजकारण करू नका. अशा शब्दात भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप यांना खडे बोल सुनावले

4. औषध फवारणी यंत्र विकत घेउन केलं लोकार्पण  
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. शासन प्रशासन हे त्याला आळा घालण्याकरिता विशेष परिश्रम घेत आहे.पतसंस्था फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली साई निवारा मित्र मंडळाने नवरात्र उत्सवाच्या बचतीच्या रकमेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने औषध फवारणी यंत्र विकत घेउन लोकार्पण करण्यात आले होते.

5. अकोले  येथील मारहाण प्रकरण एसपींना मागितला खुलासा
अकोले  पोलीस ठाण्यात राडा करणाऱ्या विरोधात पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल केल्याने, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभय परमार यांना या प्रकरणी चौकशी करून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. अकोला पोलीस ठाण्यात 18 एप्रिल रोजी रात्री दोन गटांनी आपापसात शिवीगाळ करून आरडाओरडा करून हाणामारी केली होती. 

6. ग्रामीण भागात कोरोनाविषाणूचा वाढतोय धोका
कोरोनाचा सर्वाधिक धोका ग्रामीण भागाला पाहायला मिळत आहे. सध्या अकोले, कर्जत, कोपरगाव, राहता, नगर, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. राहता, श्रीरामपूर आणि नगर या तीन तालुक्‍यातच आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहे. सध्याही नगर शहरातील कोविड हॉस्पिटल मध्ये भरती होणारे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातून येत आहेत. 

7. होम आयसोलेशन बंदच करा
जिल्ह्यातील कोविड रूग्णांसाठी आवश्यक असणारा. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ऑक्सीजन चा तुटवडा  जाणवू दिला जाणार नाही. असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सांगितले. तसेच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बाधित रुग्णांचे होम इंसुलेशन बंद करण्याबाबत कठोर अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने करावी असे आदेशही महसूल मंत्री थोरात यांनी दिली

8. शेळकेवाडी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के 
संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी या ठिकाणी रात्री सात वाजून 49 मिनिटांनी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवायला मिळाले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नाशिकच्या भूमापक यंत्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहे

9. शेततळ्यातून वीज पंप चोरला
कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील शेततळ्यातून चोरट्याने दहा हजार 500 रुपयांचा वीजपंप चोरून नेला. एकोणावीस ते वीस एप्रिल दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात हनुमंत चंद्रकांत राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10. दारासमोर बांधलेले तीन बैल चोरले
राहता तालुक्यातील शेतकर्‍यांच्या दारासमोर बांधलेले 60 हजार रुपये किमतीचे तीन बैल चोरून नेले 22 ते 23 एप्रिल दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात एकनाथ शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *