25 एप्रिल Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. दरोडेखोरांच्या अंबड पोलीसांनी मुस्क्या आवळल्या
अंबड तालुक्यातील खडकेश्र्वर येथे विहीरीचे काम करणाऱ्या मजुरांवर 16 एप्रिल रोजी रात्री साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान अनोळखी सहा दरोडेखोरांनी हल्ला केला होता... सोन्याचांदीचे दाग दागीने व एक मोबाईल असा 41 हजार रुपयांचा माल लंपास केला होता.
2. औरंगाबाद शहरात वाढत असलेला कोरोना रुग्णांचा आकडा हा धडकी भरवनारा आहे
रोजच 1000 च्या वर नव्याने पेशंट ची नोंद होत आहे अशातच कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननिय ऊध्वव ठाकरे यांनि लाँकडाऊन ची घोषणा केलेली होती आज लाँकडाऊनचा तिसरा दिवस आहे या लाँकडाऊन ला शहरातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे.
3. उद्योगनगरीतील विविध ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
औरंगाबाद वाळूज, चीतेगाव, गेवराई तांडा, शेंद्रा अश्या 6 विविध ठिकाणी उद्योगनगरीतील सागर गॅस सर्व्हीसेस, झांबड ऑक्सिजन वायू निर्मिती, एम आय डी सी वाळुज, रुक्मिणी मेटल्स गेवराई तांडा. आर एल स्टील अँड एनर्जी ऑक्सीजन निर्मिती, चीतेगाव एमआयडीसी, सुशील ऑक्सिजन निर्मिती व स्टार लाईट ऑक्सिजन निर्मिती करणाºया प्रकल्पाची आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पथकासह पाहणी केली.
4. पाचोरा मतदार संघात होणार दोन ऑक्सिजन प्रकल्प
जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे कोरोना रुग्णांची व भविष्यातील दुरोगामी आरोग्य उपाययोजना म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपायांच्या निधीची तरतूद केली.
5. गावात सॅनिटायझर फवारणी
गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगांव ग्रामपंचायततर्फे गावात कोरोना संसर्ग विषाणु चा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने महिला सरपंचा मनिषाताई कृष्णकांत व्यवाहारे व उपसरपंच प्रकाश पिंपाळे यांच्या सहकार्याने गावात सॅनिटाईझर फवारणी करण्यात आली.
6. घर विक्री च्या वादातून पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीस केली मारहाण
औरंगाबाद वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या रांजणगाव (शे). येथील घर विक्री करण्यास नकार देणाºया पतीस पत्नीने प्रियकर व त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवार घडली. या प्रकरणी चौघाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7. डोंबिवलीत मनविसेकडून जंतुनाशक फवारणी
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत.दर दिवशी १५०० च्या जवळ कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.व डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक असे ४०० च्या आसपास रुग्ण सापडत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सुनील नगर व तुकाराम नगर मध्ये जंतुनाशक फवारणी केली जात आहे.
8. पाचोरा तालुक्यात कोविड सेंटर उभे करा :कॉग्रेसची मागणी*
पाचोरा तालुक्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत. त्यातच खाजगी कोविड सेंटर मध्ये पैशा अभावी काहींना जीव गमवावा लागला आहे. आधीच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक हानी झाली आहे.
9. सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर;
भारत बायोटेकने संपूर्ण स्वदेशी लस COVAXIN लसीच्या प्रति डोसच्या किमतीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं की, राज्य सरकारसाठी प्रति डोस 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस दराने देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने सांगितलं की, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, आम्ही कोवॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतींची घोषणा केली आहे.
10. 20 कोरोनाबाधितांचं रुग्णालयातून पलायन; यवतमाळमध्ये खळबळ
राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंचावत असतानात आता हीच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पण, यवतमाळमध्ये यादरम्यानच एक मोठं संकट आलं आहे. जिल्ह्याच्या घाटंजी येथील कोविड केअर सेंटरमधून 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पलायन केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
No comments
Post a Comment