Breaking News

1/breakingnews/recent

23 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख, जखमींना ५० हजारांची मदत.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, जखमींना 50 हजारांची मदत
विरार येथे विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे ट्विट करुन ही माहिती देत मोदींनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी ट्विट करून संवेदना देखील व्यक्त केले आहेत

2. ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमहून महाराष्ट्राकडे रवाना
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी विशाखापट्टणम येथील स्टील प्रकल्पातून रेल्वेद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. 

3. भारतात कोरोनाची स्थिती गंभीर, आम्ही मदत करण्यास तयार- चीन
देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे देशात ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड आणि आवश्यक त्या औषधांची कमतरता भासत आहे. या सर्व परिस्थितीवर चीननं प्रतिक्रिया दिली आहे.

4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावुक
विरारमधील रुग्णालयात आग लागून झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भावुक झाले असून त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. 

5. विरार हॉस्पिटलची दुर्घटना नॅशनल न्यूज नाही; आरोग्य मंत्र्यांचं धक्कादायक विधान
विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झालेला असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असं बेजबाबदार विधान राजेश टोपे यांनी व्यक्त केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

6. भिलई प्रकल्पातून महाराष्ट्राला पूर्ववत ऑक्सिजन पुरवठा करा-हाय कोर्ट
राज्यातील कोविड रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन मिळावा यासाठी भिलई प्रकल्पातून महाराष्ट्राला पुरवठा केला जात होता मात्र राज्यातील वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीकडे दुर्लक्ष करत हा पुरवठा कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

7. बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती देणार नाही; ममता बॅनर्जीं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यावर तृणमूल काँग्रेस नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी जोरदार पलटवार केला. मी खेळाडू नाही. पण खेळ कसा खेळतात हे मला चांगलेच ठाऊक आहे. 

8. मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी उचलावी
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांचा आधारवड आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाबाबत काम करणाऱ्या सर्व विभागांनी अत्यंत दक्षतापूर्वक आणि गांभीर्याने काम करून मृत्यूदर कमी करण्यासाठी जबाबदारी उचलावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी सीपीआर रुग्णालयातील सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. 

9. 'सलाम पुणेकर' म्हणत महापौरांनी पुणेकरांना सांगितली ही खुशखबर
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना पाहायला मिळत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या कमी करण्यासाठी यश येताना दिसत आहे.

10. इयान मॉर्गनला 12 लाखांचा दंड
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनवर मुंबईत चेन्नई सुपर किंग्ज विरोधात झालेल्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॉर्गनला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *